Sunny Leone | सनी लियोनला मुंबईच्या पावसाने अक्षरशः रडवले होते; केले लाखोंचे नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सनी लियोन (Sunny Leone) ही नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. सनी लियोन हिचा चाहता वर्ग मोठा असून तिच्या चित्रपटांपेक्षा सनीच्या वैयक्तिक आय़ुष्याबद्दल तिच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. अभिनेत्री सनी ही सोशल मीडिय़ावर देखील सक्रिय असून अनेकदा ती तिचे हॉट फोटोशूट (Sunny Leone Hot Photoshoot) शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोशूटची चर्चा सोशल मीडियावर रंगत असते. नुकतेच सनी लियोन (Sunny Leone) हिने तिचे मुंबईच्या पावसाने किती नुकसान केले आहे आणि त्यामुळे ती अक्षरशः रडली आहे असे तिच्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

अभिनेत्री सनी लियोन ही काही बॉलीवुड चित्रपटांमध्ये आणि आयटम सॉंग्समध्ये (Sunny Leone Item Songs) झळकली आहे. तिचा मोठा चाहता वर्ग असून तिचे इंस्टाग्रामवर 54.4 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. सनीने एका मुलाखतीमध्ये मुंबईच्या पहिल्या पावसाने तिचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे हे सांगितले आहे. सनी लिओन म्हणाली की, मी मुंबईत समुद्राजवळ राहायचे. पावसाळ्यात तिथल्या भिंतीवरून पाणी टपकत होते आणि त्यामुळे तिथे ठेवलेल्या अनेक वस्तू ओलसर झाल्या होत्या. मला पावसाळा ऋतू खूप आवडतो, पण जोपर्यंत मी घरात असते तोपर्यंतच.”

पुढे ती म्हणाली की, “मुंबईमध्ये मी नवीन राहायला आले तेव्हा मला येथील पावसाची कल्पना नव्हती.
मुंबईच्या पावसात माझ्या तीन महागड्या गाड्या खराब झाल्या आहेत. त्यापैकी दोन कार या एकाच दिवशी वाहून गेल्या, त्यातील एक 8 सीट असणारी मर्सिडीज होती. पावसात माझ्या महागड्या कार गमावल्यानंतर मला खूप दुःख झालं आणि मी खूप रडले, कारण जर तुम्ही परदेशातून भारतात निर्यात केलेल्या कार खरेदी केल्या तर तुम्हाला त्यावर भरपूर कररुपी रक्कम भरावी लागते.”

अभिनेत्री सनी लियोन हिने सांगितले की, “पण आता मी हुशार झाले आहे. मला मुंबईच्या पावसाचा अंदाज आला आहे.
मला हे देखील समजले की वस्तू हरवण्यापेक्षा किंवा खराब होण्यापेक्षा कोणालाही दुखापत न होणे जास्त महत्वाचे असते.
मी मेड इन इंडिया ट्रकही खरेदी केला आहे.”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | पर्वती भागात दहशत माजविणाऱ्या बिपीन मापारी व त्याच्या इतर 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 45 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Keshav Upadhye In Pune | भाजपातर्फे 14 ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका दिवस’ पाळला जाणार; नागरिकांच्या सहभागाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आवाहन