आता ’अनामिका’मध्ये दिसणार सनी लिओनी; शुटिंग सुरू

पोलिसनामा ऑनलाईन टीम, दि. 22 डिसेंबर : बॉलीवूडमध्ये कमी कालावधीत नाव कमविणारी अभिनेत्री सनी लिओनी आता ‘अनामिका’मध्ये दिसणार आहे.

सनी लिओनीने ‘अनामिका’च्या शुटिंगला सुरूवात केली असून ’अनामिका’मध्ये अ‍ॅक्शन करताना ती दिसणार आहे. अभिनेत्री सनी लिओनीने आगामी प्रोजेक्ट ‘अनामिका’च्या शूटिंगला सुरूवात केली असून तिने ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिलीय.

‘अनामिका’चे दिग्दर्शन विक्रम भट करणार आहे. सनी लिओनी विक्रम भट यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करणार असून अद्याप हे स्पष्ट झाले नाही की ‘अनामिका’ चित्रपट आहे की वेबसीरिज.

अभिनेत्री सनी लिओनीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. ज्यात तिने ‘अनामिका’च्या सेटवर क्लिपबोर्ड पकडलेला दिसतोय.

एका नवीन कामाला सुरूवात होतेय, आणि माझा लॉकडाउन संपत आहे. विक्रम भटसोबत नवीन प्रवासाला सुरूवात केलीय. लॉकडाउननंतर अभिनेत्री सनी लिओनीचा हा पहिला प्रोजेक्ट आहे.