Sunny XI Karandak | ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! आर्यन क्रिकेट क्लब संघाचा सलग दुसरा विजय !!

पुणे : Sunny XI Karandak | सनी इलेव्हन तर्फे आयोजित ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत अक्षय काळोखे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर आर्यन क्रिकेट क्लब संघाने एसके डॉमिनेटर्स संघाचा ९ गडी राखून पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवित बाद फेरीकडे वाटचाल केली. (Sunny XI Karandak)

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर झालेल्या क गटाच्या सामन्यात अक्षय काळोखे याची अचूक गोलंदाजी आणि त्यानंतर ऋषीकेश सोनावणे आणि कौशल तांबे या सलामीवीरांच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर आर्यन क्रिकेट क्लबने विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एसके डॉमिनेटर्स संघाने १६० धावांचे आव्हान उभे केले. रोहीत खरात (५७ धावा), यश माने (३० धावा), सुरज परदेशी (२८ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. अक्षय काळोखे याने १९ धावात ४ गडी टिपत अचूक गोलंदाजी केली. (Sunny XI Karandak)

हे आव्हान आर्यन क्रिकेट क्लबने १५ षटकात व १ गडी गमावून सहज पूर्ण केले. ऋषीकेश सोनावणे याने २८ चेंडूत ८
चौकार आणि ५ षटकारांसह ६६ धावा तर, कौशल तांबे याने ३९ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५४ धावांची
खेळी केली. पुरंजयसिंग राठोड याने नाबाद ४२ धावांचे योगदान दिले. कौशल तांबे आणि ऋषीकेश यांनी ४८ चेंडूत ८४
धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. त्यानंतर कौशल याने पुरंजयसिंग याच्या साथीत ५६ चेंडूत ८०
धावांची अभेद्य भागिदारी करून संघाचा विजय साकार केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एसके डॉमिनेटर्सः २० षटकात ९ गडी बाद १६० धावा (रोहीत खरात ५७ (३५, ६ चौकार, ४ षटकार), यश माने ३०,
सुरज परदेशी २८, अक्षय काळोखे ४-१९) पराभूत वि. आर्यन क्रिकेट क्लबः १५ षटकात १ गडी बाद १६४ धावा
(ऋषीकेश सोनावणे ६६ (२८, ८ चौकार, ५ षटकार), कौशल तांबे नाबाद ५४ (३९, ६ चौकार, २ षटकार),
पुरंजयसिंग राठोड नाबाद ४२ (२४, २ चौकार, ४ षटकार); सामनावीरः अक्षय काळोखे;

Web Title :- Sunny XI Karandak | ‘Sunny XI Karandak’ Championship Cricket Tournament! Aryan Cricket Club team’s second win in a row !!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar Resigns | शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीनं फेटाळला, पुढं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष (Video)

Pune Cyber Crime News | अमेरिकेतील बहिण अडचणीत असल्याचे समजून त्याने पाठविले पैसे; सायबर चोरट्यांनी घातला दीड लाखांना गंडा