स्पर्म काऊंट वाढवतात ‘हे’ 8 फूड, ‘या’ 5 वस्तूंपासून पुरुषांनी दूर राहण्याची आवश्यकता

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तुम्ही जे खाता-पिता त्याचा तुमच्या फर्टिलिटीवर खुप परिणाम होतो. विशेषता फॅमिली प्लॅन करणार्‍यांनी शारीरिकदृष्ट्या स्वताला पूर्णपणे तयार केले पाहिजे. फर्टिलिटी डाएट महिलांसह पुरुषांसाठी सुद्धा खुप महत्वाचे ठरते. काही फूड स्पर्म काऊंट (Sperm count) वाढवण्यासह त्याची क्वालिटी सुद्धा चांगली करतात. तर काही स्पर्म काऊंट (Sperm count) कमी करतात. या फूड्सबाबत जाणून घेवूयात…

Symptoms of High Blood Pressure | ‘ही’ आहेत उच्च रक्तदाबाची लक्षणे, निष्काळजीपणा पडू शकतो महागात; जाणून घ्या

हे फूड्स फर्टिलिटीसाठी आहेत चांगले

1 भोपळ्याचे बी –
यातील पुरुषांची फर्टिलिटी, स्पर्म मोटिलिटी आणि स्पर्म काउंट (Sperm count) वाढवते.

2 संत्रे –
यातील व्हिटॅमिन सी मुळे स्पर्म मोटिलिटी, काऊंट आणि क्वालिटी वाढते. सोबतच टोमॅटो, ब्रोकली आणि कोबीचासुद्धा डाएटमध्ये समावेश करा.

3 गडद रंगाच्या पालेभाज्या –
पालक, लेट्यूस, ब्रसेल्स स्प्राउट्स आणि शतावरीमधील फोलेट स्पर्म मजबूत आणि हेल्दी बनवते.

4 डार्क चॉकलेट –
डार्क चॉकलेटमधील आर्जिनिन नावाच्या अमिनो अ‍ॅसिडमुळे स्पर्म काऊंट आणि क्वालिटी सुधारते

4 सॅल्मन आणि सार्डिन फिश –
सॅल्मन, मॅकेरल, टूना, हेरिंग आणि सार्डिन फिशमधील ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड स्पर्म क्वालिटी आणि काऊंट सुधारण्यास मदत करते.

5 डाळिंबाचा ज्यूस –
यातील अँटीऑक्सीडेंटमुळे टेस्टोस्टेरोनचा स्तर सुधारतो. यामुळे पुरुषांची लैंगिक इच्छा वाढते, स्पर्मचा विकास चांगला होतो.

6 ब्राझील नट्स –
ब्राझील नट्समध्ये आढळणारे सेलेनियम स्पर्मची संख्या, आकार आणि क्रियाशिलता वाढवते.

7 पाणी –
शरीर हायड्रेटेड राहिल्याने चांगले सेमिनल फ्लूएड तयार होते.

स्पर्म खराब करणारे फूड
काही फूडचे सेवन केल्याने स्पर्मवर वाईट परिणाम होतो. जर तुम्हाला फर्टिलिटी वाढवायची असेल तर पुढील गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे…

1 फ्राइड फूड्स –
यामुळे स्पर्म क्वालिटी खराब होते.

2 फुल फॅट डेयरी प्रोडक्ट –
यातील एस्ट्रोजनमुळे हेल्दी स्पर्म कमी होतात.

3 प्रोसेस्ड मीट –
प्रोसेस्ड मीट, हॉट डॉग्ज, सॉसेज आणि मीट सॉसमुळे स्पर्म काऊंट कमी होतो.

4 कॅफीन –
संशोधनात समजले आहे की, कॅफीनचा जास्त वापर महिला आणि पुरुषांच्या फर्टिलिटीवर वाईट परिणाम करतो. यामुळे गर्भपात सुद्धा होऊ शकतो.

5 दारू –
एक किंवा दोन ड्रिंक ठीक आहेत, परंतु तुम्ही एका आठवड्यात 14 पेक्षा जास्त ड्रिंक्स करत असाल तर यामुळे टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होतो. दारूमुळे स्पर्म काऊंटसुद्धा कमी होतो.

Also Read This : 

 

Signs Before Kidney Failure | किडनी फेल होण्यापुर्वी शरीर देतं ‘हे’ संकेत, नजर अंदाज नका करू; जाणून घ्या

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण