वकील दाम्पत्याच्या हत्येवर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने (SCBA) तेलंगणातील वकिलांच्या हत्येप्रकरणी निंदा केली. 17 फेब्रुवारीला एका वकील दाम्पत्य जी. वामन राव आणि पी. व्ही. नागमणी यांना कारमधून बाहेर काढत निर्घृण हत्या केली होती. या हत्येवरून SCBA ने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना गुन्हेगारांच्या अटकेसाठी निर्देश द्यावे, असे सांगितले.

तेलंगणातील वकील दाम्पत्य जी. वामन राव आणि पी. व्ही. नागमणी यांची 17 फेब्रुवारीला हत्या करण्यात आली. त्यांना कारमधून बाहेर काढण्यात आले. या हत्येवरून SCBA च्या कार्यवाहक सचिव रोहित पांडेय यांनी सांगितले, की असोसिएशन या हत्येची निंदा करत आहे. जनहिताचे मुद्दे उपस्थित करणाऱ्या या वकिलांच्या हत्येने संपूर्ण न्याय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारची घटना स्वतंत्र लोकशाहीसाठी चांगली नाही.

तसेच SCBA ने पुढे सांगितले, की तेलंगणाच्य़ा मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाच्या तपासाचे निर्देश संबंधित पोलिस आयुक्तांना द्यावेत. पोलिसानीही या प्रकरणाचा तपास करून आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करत आहे.