Supreme Court | सर्वोच्च न्यायालय हे ‘तारीख पे तारीख’ न्यायालय होऊ नये, हीच इच्छा : CJI चंद्रचूड

नवी दिल्ली : Supreme Court | जोपर्यंत आत्यंतिक आवश्यकता नसेल, तोपर्यंत ते प्रकरण स्थगित करावे किंवा पुढील तारीख घेऊ नये. गेल्या दोन महिन्यांत वकिलांकडून ३ हजार ६८८ याचिकांसाठी पुढील तारीख मिळावी, यासाठी विनंती केली. सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) हे तारीख पे तारीख असे न्यायालय होऊ नये, अशी मनापासून इच्छा आहे, अशी ‘मन की बात’ करत सरन्यायाधीश चंद्रचूड (Chief Justice Chandrachud) यांनी वकिलांसमोर चिंता व्यक्त केली आहे. याआधीही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी तारखा पडण्यावरुन एका वकिलाला खडेबोल सुनावले होते.

न्या. चंद्रचूड यांनी माहिती दिली की, सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल होण्यापासून ते प्रथमच सुनावणीसाठी येईपर्यंत किमान वेळ लागेल याची खात्री करण्यासाठी या प्रक्रियेवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे.

वकीलांना आवाहन करताना न्या. चंद्रचूड म्हणाले, प्रकरणांची सुनावणी टळली किंवा लांबली तर मग सुनावणी लवकर घेण्याचा हेतूच अपयशी ठरतो. जर तारीख पे तारीखच मिळत राहिली तर लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडून जाईल. जर गरज नसेल तर पुढची तारीख देऊ नका, सुनावणी लांबवू नका किंवा टाळू नका. (Supreme Court)

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, सप्टेंबर महिन्यात २३६१ प्रकरणे अशी आहेत ज्यामध्ये पुढची तारीख
मागण्यात आली आहे. अशा प्रकारची मागणी करणे हेच चुकीचे आहे.
अशा प्रकारे तारखाच पडत राहिल्या तर लोक न्यायालय म्हणून आपल्यावर विश्वास कसा काय ठेवतील?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | ‘वर्क फ्रॉम होम’च्या नादात बँक खातं रिकामं, पुण्यातील युवकाने गमावले साडे 15 लाख

Cyber Crime News | सायबर चोरट्यांचा नवा फंडा! ‘जहाजावर समुद्री चाचांचा हल्ला होणार आहे,
डॉलर पाठवले आहेत’, असे सांगून पुण्यातील महिलेची 10 लाखांची फसवणूक

Sassoon Hospital | ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकले सहा जण, अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका