Cyber Crime News | सायबर चोरट्यांचा नवा फंडा! ‘जहाजावर समुद्री चाचांचा हल्ला होणार आहे, डॉलर पाठवले आहेत’, असे सांगून पुण्यातील महिलेची 10 लाखांची फसवणूक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Cyber Crime News | बदलत्या काळाबरोबर आपल्या सवयीही आता हायटेक झाल्या आहेत. बँकेच्या व्यवहारापासून ते जवळपास सर्वच खरेदी ऑनलाइन करण्यावर भर वाढला आहे. याचाच फायदा सायबर गुन्हेगार (Pune Crime News) घेत आहेत. पूर्वी लिंक पाठवून, एसएमएस किंवा इतर फंडे वापरुन लुटण्यात येत होते. मात्र आता समुद्री चाचांच्या नावाखाली फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. (Cyber Crime News)
पुण्यातील एका 60 वर्षाच्या महिलेला जीवनसाथी मेट्रोमनी (Jeevan Saathi MetroMoney) प्रोफाईल आयडी धारकाने संपर्क केला. त्या व्यक्तीने महिलेला जहाजावर समुद्री चाचांचा हल्ला होणार आहे. त्याच्याकडे असलेले 1 लाख 29 हजार डॉलर पाठवले असल्याचे सांगून 9 लाख 93 हजार 225 रुपये घेऊन फसवणूक केली. याबाबत केशवनगर मुंढवा येथे राहणाऱ्या महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जीवनसाथी मेट्रोमनी प्रोफाइल आयडी धारक व ईमेल आयडी धारकावर आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 28 मे ते 20 जुलै 2023 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवनसाथी मेट्रोमनी प्रोफाईल आयडी धारक व ईमेल आयडी धारक यांनी मेट्रोमनी साईटवरुन फिर्यादी यांना संपर्क केला. जहाजावर समुद्री चाचांचा हल्ला होणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले 1 लाख 29 हजार डॉलर पाठवल्याचे फिर्यादी यांना सांगितले. त्यासाठी व्हीसा चार्जेस, सिक्युरीटी डीपॉझीट, अॅसीडने नोटा धुवुन देणे यासाठी फिर्यादी यांना बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. (Cyber Crime News)
त्यानुसार फिर्यादी यांनी सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाईन 9 लाख 93 हजार 225 रुपये पाठवले.
पैसे पाठवल्यानंतर फिर्यादी यांना डॉलर मिळाले नाहीतच शिवाय त्यांनी दिलेले पैसे देखील
आरोपींनी परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Sassoon Hospital | ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकले सहा जण, अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका
Pune SPPU News | पुणे विद्यापीठात पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह लिखाण, भाजपचे आंदोलन;
भाजयुमो आणि एसएफआय कार्यकर्त्यांमध्ये ‘राडा’