Sassoon Hospital | ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकले सहा जण, अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ससून हॉस्पिटलच्या (Sassoon Hospital) नव्या इमीरतीमध्ये चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्टमध्ये पाच ते सहा जण अडकल्याची घटना घडली होती. अग्निशमन दलाकडून (Fire Brigade) लिफ्टमध्ये अडकलेल्या सहा जाणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे. (Sassoon Hospital)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.3) दुपारी ११ वाजून ५० मिनिटांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात ससून रुग्णालय (नवीन इमारत) येथे लिफ्ट अडकली असून आतमध्ये काही नागरिक अडकले आहेत अशी वर्दी मिळाली. अग्निशमन दलाच्या मुख्यालयातून एक फायर गाडी व एक रेस्क्यु व्हॅन तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या.

घटनास्थळी पोहोचताच ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) नवीन इमारतीत (क्रमांक १००) चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट सुमारे तासभर अडकली होती. त्यावेळी आतमध्ये सहा जण असल्याची जवानांकडून खात्री करण्यात आली.

जवानांनी लिफ्टमध्ये असणाऱ्या लोकांना “घाबरू नका; आम्ही आहोत” असे म्हणत धीर दिला. काही जवानांनी अकरा मजली असलेल्या इमारतीच्या गच्चीवर जात लिफ्ट रुममधून सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. आणि त्याचवेळी खाली लिफ्ट अडकलेल्या ठिकाणी लोकांची भेदरलेली परिस्थिती व गुदमरलेली स्थिती पाहत तातडीने एका फॅनची व्यवस्था करुन हवेचा स्तोत्र सुरू केला. जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लिफ्टचा दरवाजा वाकवत व ओमेगा कंपनी लिफ्टच्या कर्मचाऱ्यांसमवेत सातव्या मजल्यावर जाऊन लिफ्ट चालू बंद करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रुग्णालयाचे चार कर्मचारी (तीन पुरुष एक महिला) व दोन नागरिक (पुरुष) अशा एकुण सहा जणांची ठिक स सुखरुप सुटका केली.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी संजय रामटेके, प्रशांत गायकर व वाहनचालक सचिन चव्हाण,
ओंकार साखरे तसेच तांडेल सुनिल नामे आणि जवान भुषण सोनावणे, केतन नरके, परेश जाधव,
अक्षय शिंदे यांनी सहभाग घेतला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune SPPU News | पुणे विद्यापीठात पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह लिखाण, भाजपचे आंदोलन;
भाजयुमो आणि एसएफआय कार्यकर्त्यांमध्ये ‘राडा’

Pradhan Mantri Kharif Pik Yojana | २५ लाख शेतकऱ्यांना १,३५२ कोटी नुकसानभरपाई;
विमा कंपन्या तयार! पावसाच्या खंडामुळे २५ टक्के लाभ