Supreme Court | ”मतदारांना उमेदवाराची माहिती जाणून घेण्याचा अधिकार” – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Supreme Court | मतदान हा देशातील नागरिकांचा (SC on Voter’s Rights) हक्क आहे. त्यामुळेच निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवाराची सर्व माहिती जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना असल्याचे महत्त्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) व्यक्त केले आहे. न्यायमूर्ती एस. रवींद्र भट (Justice S. Ravindra Bhat) आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार (Justice Arvind Kumar) यांच्या खंडपीठाने हे मत मांडले आहे.

मतदानाचा हक्क हा अमूल्य आहे. प्रदीर्घ आणि कठोर स्वातंत्र्यलढ्याचा परिणाम म्हणून हा हक्क देशाच्या प्रत्येक नागरिकाला मिळाला आहे. त्यामुळे हा नागरिकांचा अविभाज्य अधिकार आहे. लोकशाही (Democracy) ही राज्यघटनेची एक अत्यावश्यक बाब आहे. मात्र, तरीही मतदानाचा अधिकार हा केवळ वैधानिक अधिकार मानला जातो. भारतात मतदानाचा हक्क हा मूलभूत अधिकारांमध्ये गणला जात नाही हा मोठा विरोधाभास असल्याचे मत ही सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) यावेळी व्यक्त केले आहे.

दरम्यान, तेलंगणामधील नेते के. मदन मोहन राव (K. Madan Mohan Rao) यांनी भारत राष्ट्र समितीचे (BRS) खासदार भीमराव पाटील (MP Bhimrao Patil) यांच्याविरोधात याचिका (Petition) दाखल केली होती. भीमराव पाटील यांचा 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) 6,299 मतांनी विजय झाला होता. मदन मोहन राव हे त्यांच्या विरोधात उभे होते.

निवडणूक झाल्यानंतर राव यांनी पाटील यांच्यावर आरोप केले होते, की त्यांनी आपल्यावर असलेल्या गुन्ह्यांची
माहिती सार्वजनिक केली नव्हती. हे नियमांचे उल्लंघन आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने (Telangana High Court)
ही याचिका रद्द केली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश रद्द करत, या प्रकरणाची पुन्हा चौकशी (Inquiry)
करण्याचे आदेश दिले. यामुळे आता राव यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवर (Election Petition) पुनर्विचार
केला जाईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर