सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांना कोरोनाची बाधा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्यांपासून ते विशेष व्यक्तीपर्यंत सर्वजण अडकत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांना कोरोनाची बाधा झाली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या एका कर्मचाऱ्याला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे न्या. चंद्रचूड यांची तब्येत बरी असली तरी त्यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर सध्या कोणतीही सुनावणी होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या कोरोनासंदर्भातील सुनावणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाद्वारे होत आहे. गुरूवारी या प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र त्या आधीच न्यायमूर्ती चंद्रचूड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे न्यायाधीशांच्या अनुपस्थितीमुळे सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.