Pune News | सुप्रिया केंद्रे राज्यातील पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक; श्वान प्रशिक्षण अभ्यासक्रम परीक्षेत देशात सर्वप्रथम

पुणे (Pune news) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – पोलीस दला (Police Force) साठी काम करणाऱ्या श्वानां (Dogs) चा सांभाळ करणे हे कठीण काम मानले जाते. त्यांचा सांभाळ अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. पोलीस श्वानां (Police Dogs ) ना दिले जाणारे प्रशिक्षणही अन्य श्वानांपेक्षा खडतर असते. सक्ती किंवा ताकीद फक्त शब्दातून द्यावी लागते. मारहाण तर अजिबातच चालत नाही, अशा परिस्थितीतही श्वान प्रशिक्षण अभ्यासक्रम परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मान राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (State Criminal Investigation Department) श्वान प्रशिक्षक सुप्रिया किंद्रे (Supriya kindre) -धुमाळ यांनी मिळवला आहे. राज्यातील पहिली महिला श्वान प्रशिक्षक होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. Supriya kindre is the first female dog trainer in the state;
Rank 1 in the country in dog training course exams

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

सुप्रिया यांनी मध्यप्रदेशातील टेकनपूर येथील नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग (एनडीसीडी) या संस्थेतून श्वान प्रशिक्षक अभ्यासक्रम पूर्ण केला. देशभरातील विविध राज्यातील पोलीस तसेच निमलष्करी दलातील श्वान प्रशिक्षक या अभ्यासक्रमात सहभागी झाले होते. या अभ्यासक्रमासाठी निवडल्या गेलेल्या सुप्रिया एकमेव महिला होत्या. महाराष्ट्र पोलीस दलातून त्यांना श्वान प्रशिक्षक अभ्यासक्रमास पाठविण्यात आले होते. या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत महिलेची निवड झाली नव्हती.

श्वान हाताळणी (हँडलर) ते प्रशिक्षकपदापर्यंतचा प्रवास उलगडताना त्या म्हणाल्या, ह्या श्वानांना पुरुषांकडून प्रशिक्षण दिले जाते. देशपातळीवर पोलीस किंवा निमलष्करी दलातील श्वान केंद्रात (डॉग युनिट) महिला प्रशिक्षक नाहीत. महिला श्वान हँडलर आहेत. पण प्रशिक्षकपदापर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. देशभरात पोलीस श्वान प्रशिक्षण विषयक तीन संस्था आहेत. मध्यप्रदेशातील टेकनपूर, राजस्थानातील अलवार आणि चंदीगडमध्ये या संस्था आहेत. श्वानांना वेगवेगळ्या पातळीवर प्रशिक्षण दिले जाते. अमली पदार्थांचा माग काढणाऱ्या श्वानांना ह्यनार्कोह्ण म्हटले जाते. गुन्हेगारांचा माग काढणारे तसेच स्फोटके हुडकून काढणाऱ्या श्वानांना वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. गस्त (पेट्रोलिंग) तसेच बंदोबस्तासाठी (गार्ड) वेगळे प्रशिक्षण असते. भूसुरुंग शोधून काढण्याचेही प्रशिक्षण श्वानांना दिले जाते.

पोलीस श्वानांचे प्रशिक्षण अवघड
पोलीस दलातील श्वानांना हाताळणाऱ्या महिलांची संख्या अत्यल्प आहे. महाराष्ट्रातील श्वानांना पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील श्वान प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षकांना श्वानांचा सांभाळ करण्याची आवड असणेही महत्त्वाचेआहे. माझ्या वडिलांनी मला श्वानांचा लळा लावला. अगदी लहान वयापासून मी श्वानांचा सांभाळ करायचे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बोगवली हे माझे गाव आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी तसेच वरिष्ठ अधिकाºयांनी मला मार्गदर्शन केल्याने मी श्वान प्रशिक्षक अभ्यासक्रमात यश मिळवू शकले.

– सुप्रिया किंद्रे 

सुप्रिया किंद्रे यांनी श्वान प्रशिक्षण अभ्यासक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केला. करोनाच्या संसर्गात टेकनपूर येथील श्वान प्रशिक्षण संस्थेतून त्यांनी निवासी अभ्यासक्रम पूर्ण केला. अशा प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण करणाºया त्या राज्यातील पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक ठरल्या आहेत.

– अतुलचंद्र कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस महासंचालक, सीआयडी

 

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Supriya kindre is the first female dog trainer in the state;
Rank 1 in the country in dog training course exams

हे देखील वाचा

Pune Crime News | उच्चशिक्षीत विवाहीतेचा छळ !
पुण्यातील बड्या उद्योजक कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल;
पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे झाला बहिरा

Maharashtra Monsoon | बळीराजांवर अस्मानी संकट !
राज्यात पुढील 10 दिवस पावसाची दांडी, हवामान खात्याचा अंदाज

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्या कारवर सोलापूरमध्ये दगडफेक,
गोळ्या मारल्यातरी गप्प बसणार नाही, पडळकरांची प्रतिक्रिया

7th Pay Commission | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर !
7 वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता ‘या’ महिन्यात मिळणार