Supriya Sule On BJP | जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेनंतर सुप्रिया सुळेंची भाजपावर खोचक टीका, ”एवढी ताकद असताना त्यांना…”

मुंबई : Supriya Sule On BJP | शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजापामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आज राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर स्वत: जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना हे वृत्त फेटाळले आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच आज भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीवर देखील सुळे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. (Supriya Sule On BJP)

सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशमुख, जयंत पाटील अशा सगळ्यांबद्दल रोज चर्चा असते. २०० आमदार, ३०० खासदार एवढी ताकद असूनही त्यांना आमच्याकडचे लोक हवे आहेत. याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, एवढी ताकद असताना त्यांना आमच्यासारखे छोटे राहिलेले पक्ष हवेहवेसे वाटतात. काहीतरी असेल ना आमच्यात? असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, आज भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थान भेट घेतली. महायुतीला पाठिंबा मिळवण्यासाठीच आशिष शेलार यांनी ही भेट घेतल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पक्ष फोडले, घरे फोडली, आता राज ठाकरेंना भेटायला गेले.
कितीही ताकद त्यांनी लावली, फोडाफोडीचे राजकारण केले, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीचा वापर केला, तरी
त्यांना कॉन्फिडन्स नाही की ते जिंकू शकतील. यातच सगळे आले, असे सुळे म्हणाल्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune CP Amitesh Kumar | पोलीस आयुक्त अमितेश कुमार अ‍ॅक्शन मोडवर! पब, बार, रेस्टो बार, रूफ टॉप हॉटेल, क्लब आणि हुक्का पार्लर संदर्भात पुणे पोलिसांचा मोठा निर्णय (Video)

Pune Crime Branch | पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त (Video)

Namo Chashak 2024 In Pune | नमो चषक जिल्हास्तरीय शिवकालीन युद्धकला (सिलंबम) स्पर्धा संपन्न

50 लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; पोलिसांनी केली सुखरूप सुटका