Supriya Sule On PM Narendra Modi | मोदी म्हणाले ”देश परिवारवादाचा तिरस्कार करतो”, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”होय बरोबरच आहे, मी, अजितदादा, सुनेत्रा पवार…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule On PM Narendra Modi | बरोबरच आहे. अजित पवार (Ajit Pawar), सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि सुप्रिया सुळे असे आम्ही तिघेही राजकारणात परिवारवादातूनच पुढे आलो आहोत. शून्यातून शरद पवारांनी विश्व उभे केले. अजित पवार आणि मी, आम्हा दोघांनाही सॉफ्ट लँडिंग मिळाले. मी तर संसदेतही बोलले की, आम्ही राजकारणात आलो तेव्हापासून परिवारवादाचे भाग आहोतच की. ते नाकारून कसे चालेल? अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे मोदींच्या वक्तव्यावर दिली.(Supriya Sule On PM Narendra Modi)

देश परिवारवादाचा तिरस्कार करतो, असे वक्तव्य मोदींनी केले आहे, यावर सुळे यांनी अशी प्रतिक्रिया देत मोदींच्या आजूबाजूला देखील परिवारवादवालेच असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले.

सुप्रिया सुळे यांनी घराणेशाही संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर दिलेले हे उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचाही उल्लेख केला आहे.

तपास यंत्रणांच्या राजकीय वापराबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, ९५ टक्के चौकशा विरोधकांच्या झाल्या आहेत.
संसदेतील माहिती हे सांगते. देशाच्या संविधानाला भाजपाकडून धोका असल्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,
संविधानाच्या बाबतीत भाजपाचेच दोन खासदार बोलले आहेत. त्याबद्दल मला काही बोलायची गरज नाही.

इंडिया आघाडीच्या एका बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) हे खर्गे यांच्यावर रागावल्याने भरबैठकीतून निघून गेले होते,
अशी माहिती अजित पवार यांनी भाषणात दिली होती, त्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,
तशी काही घटना घडल्याची शक्यता मला वाटत नाही. वाय बी सेंटरमधल्या सगळ्या बैठकांना मी नव्हते.
पण तिथे असे काही घडल्याचे मला आठवत नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe – Shivajirao Adhalrao Patil | निवडणूक प्रचारात कोल्हे-आढळराव आमनेसामने ! हरिनाम सप्ताहात आढळरावांनी ऐकलं डॉ. कोल्हेंच संपुर्ण भाषण

Murlidhar Mohol | पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेपूर्वी मुरलीधर मोहोळ म्हणाले, येत्या काळातदेखील पुण्याच्या विकासासाठी…