दौंड : (पुणे) पोलीसनामा ऑनलाईन – लोक प्रतिनिधी आपली जबाबदारी झटकून देतात म्हणून अनेक सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचत नाहीत, तळागाळातील सर्वसामांन्य लोकांपर्यंत त्या योजना किंबहुना कित्येक वेळेस त्याची माहिती ही मिळत नाही. अनेकदा शासकीय योजना लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे जनतेपर्यंत पोहोचतच नसल्याचं चित्र पहायला मिळतं. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र शासनानं ज्येष्ठ नागरीकांसाठी सुरु केलेली वयोश्री योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच त्यांना जेवण वाढत त्यांची विचारपूस केली. इतकंच नव्हे, तर पंगतीत बसून जेवणाचा आस्वादही घेतला.
https://www.facebook.com/policenama/videos/756733028015786/
दौंड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणी शिबिरात दौंड तालुक्यातल्या गावोगावच्या ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. या शिबिराला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत सहभागी झालेल्या सर्वच ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली.