Photos : सुरभी चंदनानं शेअर केला साडीमधील ‘हॉट’ लुक !

टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना (Surbhi Chandna) सोशल मीडियावर कायमच ॲक्टीव्ह असते. आपल्या फोटो आणि व्हिडीओनं ती कायमच चाहत्यांचं अटेंशन घेत असते. पुन्हा एकदा आपल्या लुकनं तिनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सुरभीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. सध्या या फोटोंची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं साडी नेसली आहे.

सुरभी या लुकमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिनं साडीवाल्या लुकलादेखील बोल्डनेसचा तडका दिला आहे. तिचा ऑफ शोल्डर ब्लाऊजमध्ये तिनं हॉट क्लीव्हेज फ्लाँट केलं आहे.

सुरभीचा हा अवतार देखील चाहत्यांना खूप आवडला आहे. सध्या तिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे

सुरभीच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर सध्या ती संजीवनी या मालिकेत काम करत आहे. 2009 मध्ये सुरभीनं तारक मेहता का उल्टा चश्मा मलिकेत स्वीटीची भूमिका साकारली होती. यानंतर सुरभी 2013 मध्ये एक ननद की खुशियों की चाबी… मेरी भाभी या मालिकेत दिसली. यानंतर तिनं कुबूल है, आहाट, इशकबाज, दिल बोले ओबेरॉय अशा अनेक मालिकेत काम केलं. बॉबी जाजूस या सिनेमातही सुरभी झळकली आहे.