आश्चर्यम् ! कोंबडा बोलू लागला अल्लाह अल्हाह, रमजान ईद्च्या दिवशी व्हिडीओ व्हायरल (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. यामध्ये काही संदेश देणारे आसतात, तर काही मजेदार व्हिडीओ असतात. मात्र, सर्वच व्हिडीओ शेअर होतील असे नाही. तर काही व्हिडीओंना पाहून आपण अवाक् होऊन जातो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. नेटकऱ्यांकडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून त्याला काही वेळातच हजारो लाईक्स मिळाल्या आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक कोंबडा चक्क अल्लाह, अल्लाह असे म्हणताना दिसतोय.

आज रमजान ईदच्या दिवशी हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने लोकांचा तुफान प्रतिसाद या व्हिडीओला मिळत आहे. याशिवाय वेगवेगळ्या माध्यमातून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. अनेकवेळा आपल्या पाहण्यात येते की, पाळलेले पोपट, कबुतर माणसाप्रमाणे आवाज काढत नक्कल करतात. मात्र कोंबड्याला नक्कल करताना यापूर्वी आपण पाहिले नसेल. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडीओत कोंबडा बोलत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एकजण अल्लाह अल्लाह असे बोलत आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मागे कोंबडा देखील तेच म्हणत आहे.

reelkerofeelkero या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी कोंबड्याचे बोलणे पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. आतापर्यंत 800 हून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून या व्हिडीओवर लाईक्सचा पाऊस पडत आहे.