अल्सर, कॅन्सरसह ‘हे’ 5 आजार दूर करण्यात मदत करते लवंग, पुरुषांसाठी विशेष लाभदायक

नवी दिल्ली : स्वाद वाढवण्यासाठी अनेक भारतीय पदार्थांमध्ये लवंग मोठ्याप्रमाणात वापरली जाते. अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टीरियल गुण असलेली लवंग हाडे मजबूत करते आणि ब्लड शुगरसुद्धा नियंत्रित करते. तसेच लिव्हरला निरोगी ठेवते आणि पोटातील अल्सर सुद्धा कमी करण्यास मदत करते.

लवंग एक, फायदे अनेक

1. कॅन्सरपासून सुरक्षा –
एका रिसर्चनुसार, लवंगमध्ये असे घटक असतात जे कॅन्सरपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. लवंग ट्यूमरची वाढ थांबवून कॅन्सर पेशींना नष्ट करण्याची प्रक्रिया वाढवते असे एका प्रयोगात आढळून आले आहे.

2. पोटाचा अल्सर कमी करते –
यात असे कंपाऊंड्स असतात जे पोटाच्या अल्सरवर उपयोगी ठरतात.

3. ब्लड शुगर कंट्रोल –
रिसर्चनुसार, लवंगमधील कंपाऊंड ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी लाभदायक ठरतात.

4. लिव्हरसाठी –
लवंगमधील यूजेनॉल लिव्हरसाठी खुप लाभदायक आहे. फॅटी लिव्हरचा आजार लवंग रोखते. यातील अँटीऑक्सिडेंट्स लिव्हरसाठी लाभदायक आहेत.

5. पुरुषांसाठी लाभदायक –
एक्सपर्टनुसार, लवंगचे सेवन पुरुषांतील अनेक प्रकारच्या लैंगिक समस्या दूर करते. स्पर्म काऊंट वाढवते.