Surya Grahan 2021 : सूर्य ग्रहणामुळे येत्या 45-90 दिवसात होणार उलथा-पालथ ? ज्योतिषांनी केली मोठ्या संकटाची भविष्यवाणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 2021 चे पहिले सूर्य ग्रहण Surya Grahan 2021 गुरुवार, 10 जूनरोजी झाले आहे. हे ग्रहण खुप विशेष होते. हे सूर्य ग्रहण Surya Grahan खुपच विशिष्ट परिस्थिती दाखवणार आहे. ग्रह नक्षत्रांच्या या स्थितीनुसार म्हटले जाऊ शकते की देश-जगात युद्ध किंवा अग्निकांडसारखी स्थिती जन्म घेऊ शकते, असे ज्योतिर्विद पंडित कमल नंदलाल Astrologer Pandit Kamal Nandlal यांनी आजतकला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

Chandrakant Patil | ‘मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनीच केलं, शिवसेनेनं कुठ काय केलं?’

अरुणाचल आणि काश्मीरमध्ये उलथा-पालथ
पंडित कमल नंदलाल म्हणतात, मार्गशीर्ष नक्षत्र वायु तत्वाचे नक्षत्र आहे म्हणजे वायुचे प्रचलन करेल.
वृषभ रास पृथ्वीला Earth संबोधित करते. याचा अर्थ आहे की,
देश आणि जगात युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
भारताच्या अरुणाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये यापूर्वीचे चंद्रगहण Lunar eclipse दिसले होते आणि आता सूर्य ग्रहणसुद्धा लागले होते.
यामुळे तिथे उलथा-पालथ होण्याची शक्यता दिसत आहे.
या वर्षीचे पहिले चंद्रग्रहण झाल्यानंतर ताबडतोब पंधरा दिवसात दुसरे ग्रहण झाले आहे.

येत्या 45-90 दिवसात येऊ शकते मोठे संकट
भारताचा पूर्व भाग म्हणजे अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड आणि काश्मीर किंवा काश्मीरला जोडलेल्या पंजाबमधून देशात संकटाची स्थिती निर्माण होऊ शकते.
देशाच्या या भागांमध्ये येत्या 45 ते 90 दिवसांच्या आत घुसखोरीसारखी स्थिती किंवा सीमेवर खुप मोठे संकट उत्पन्न होऊ शकते.

भूकंप किंवा अग्निकांड होण्याची शक्यता
हे सूर्य ग्रहण काळ पुरुषाच्या दुसर्‍या भावात म्हणजे धनभावात झाले.
याचा पूर्ण प्रभाव विश्वाच्या वय म्हणजे एक्सीलन्स भावावर सुद्धा पडेल.
केतु वृश्चिक राशीमध्ये बसला आहे. या सूर्य ग्रहणावर चतुर्ग्रही योग झाला होता.
अशावेळी जेव्हा राहु आणि बुध एकत्र आल्याने नैसर्गिक दोष झाला आहे.
यासाठी निसर्गाकडून अग्निकांडसारखी स्थिती होऊ शकते.
याशिवाय, भूकंप किंवा अग्निकांड होण्याची शक्यता असू शकते.

भारताच्या लग्न कुंडलीत हे सूर्यग्रहण झाले आहे.
याचा थेट प्रभाव 7 व्या भावावर होतो. अशावेळी भौगोलिक दृष्टीने पाहिले तर 7 वा भाव युद्धाशी संबंधीत आहे.
यासाठी म्हटले जाऊ शकते की, ग्रहणाचा पूर्ण प्रभाव भारतावर आणि त्याच्या उचित विशेष भावावर पडला आहे.

अमेरिका आणि चीनमध्ये होऊ शकतो तणाव
ही दोन्ही ग्रहणे (26 मे रोजी झालेले चंद्र ग्रहण आणि 10 जून रोजी झालेले सूर्य ग्रहण) चीन आणि अमेरिकेवर विद्यमान झाली आहेत. वस्तुस्थिती देश काळ स्थिती पाहता म्हणता येईल की आगामी 45 ते 90 दिवसांच्या आत अमेरिका आणि चीनमध्ये युद्धासारखी स्थिती होऊ शकते. युद्धाची तणावपूर्ण स्थिती सेंटरमध्ये दिसू शकते. विश्वाच्या मध्यभागाला किबला म्हटले जाते, म्हणजे इस्त्रायल क्षेत्र. ज्योतिषनुसार, तिथे पुन्हा युद्धस्थिती दिसू शकते.

या देशांमध्ये होऊ शकते युद्धासारखी स्थिती
अशावेळी राजकीय अंतर्गत स्तर खराब होऊ शकतो. तसेच जनतेत आक्रोशाची स्थिती निर्माण होऊ शकते. पण याचा खास प्रभाव भारतात दिसून येणार नाही. भारत आपल्या आंतरराष्ट्रीय नीतीद्वारे युद्धासारख्या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होईल. परंतु येत्या 90 दिवसात विश्वात युद्धासारखी स्थिती आवश्य निर्माण होऊ शकते. चीन, कोरियामध्ये आणि अमेरिका, ब्रिटेनमध्ये युद्धासारखी स्थिती निर्माण होऊ शकते.