Sushant Singh Rajput : Drug Case चे दुबई कनेक्शन आले समोर, मुख्य संशयिताची NCB ला ओळख पटली  

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यनंतर सिनेसृष्टीतील ड्रग्सचे रॅकेट उघडकीस आले. आतापर्यंत या प्रकरणी सिलिब्रेटी आणि नामांकीत व्यक्तींची चौकशी झाली आहे. त्याताच आता या प्रकरणाचे दुबई कनेक्शन समोर आले आहे. जवळपास 6 ते 7 महिन्यांच्या प्रयत्नानंतर  मुख्य संशयित आरोपीची NCB ने ओळख पटवली असून तो दुबईत लपून बसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान NCB ने सोमवारी रात्री मालाड भागात छापेमारी केली. त्यावेळी आरोपीची ओळख पटवण्यात आली. तो दुबईतूनच आपला ड्रग्जचा काळा धंदा हाताळत असल्याचे समोर आले आहे.

साहिल शाह ऊर्फ फ्लाको असे या आरोपीचे नाव आहे. साहिल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर मारामारी, धमकावणे आदी गुन्हे आहेत.

सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशी दरम्यान NCB ने सोमवारी रात्री छापेमारी केली. सुशांत यापूर्वी  राहत असलेल्या मालाडच्या इंटरफेस हाईटच्या ई विंगमध्ये छापा टाकला होता. यावेळी साहिलची ओळख पटली. घरात त्याची आई आणि एक महिला होती. साहिल मुंबईत राहत नाही तर तो परदेशात असतो. फक्त फोन किंवा Whats App कॉलवर संपर्कात राहत असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. धाडीत साहिलच्या घरातून क्युरेटेड नार्दन अमेरिकन बड्स जप्त केले आहे. सुशांत प्रकरणात काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज पेडलर अब्बास आणि जैद या दोघांना अटक झाली होती. त्यांच्या चौकशीत साहिलचे नाव समोर आले होते. तेंव्हापासून NCB साहिलच्या मागावर होती. परंतू तो सापडला नाही. तो दुबईला पळून जाऊन तिथूनच आपला ड्रग्जचा काळा धंदा करत असल्याची माहिती मिळत आहे.