Sushant Birth Anniversary : बहिणीनं पूर्ण केलं सुशांतचं स्वप्न ! विद्यार्थ्यांना दिली 25 लाख रुपयांची स्कॉलरशिप

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची आज (गुरुवार, दि 21 जानेवारी) 35 वी बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. सुशांतचा जन्म 21 जानेवारी 1986 मध्ये पटण्यात झाला होता. सुशांतचे चाहते आज अनेक पोस्ट शेअर करत त्याची आठवण काढत आहेत. काही सेलेब्सनंही पोस्ट शेअर केल्या आहेत. सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्ति (Shweta Singh Kirti) हिनं चाहत्यांसोबत एक चांगली बातमी शेअर केली आहे. तिनं सांगितलं की, बर्कलेमधील विद्यापीठ आणि कॅलिफोर्नियात सुशांतच्या नावावर एक मेमोरियल फंड स्कॉलरशिपची सुरुवात केली आहे. तिनं सांगितलं की, हे सुशांतच्या काही त्या स्वप्नांपैकी एक होतं जे त्याला कायम पू्र्ण करण्याची इच्छा होती.

श्वेतानं तिच्या ट्विटरवरून ट्विट केलं आहे. यात तिनं 2 फोटो शेअर केले आहेत. एक सुशांतच्या एका इंस्टा पोस्टचा स्क्रीनशॉट आहे आणि दुसऱ्यात एका साईटनं प्रसिद्ध केलेली बातमी आहे. श्वेतानं ट्विटमध्ये लिहिलं की, मला ही घोषणा करताना खूप आनंद होत आहे की, भावाच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या स्वप्नांपैकी एक पूर्ण करण्यासाठी आम्ही एक पाऊल टाकलं आहे.

किती आहे सुशांत मेमोरियल फंडची किंमत ?
श्वेतानं लिहिलं की, सुशांत सिंह राजपूत मेमोरियल फंड ज्याची किंमत 35 हजार डॉलर (25 लाख रुपये) आहे, याला सुशांत डेच्या निमित्तानं बर्कलेच्या युनिव्हर्सिटीत आणि कॅलिफोर्नियात बनवण्यात आलं आहे. श्वेतानं सुशांतच्या ज्या इंस्टा पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे त्यात लिहिलं की, मी अशा एका वातावरणाची कल्पना करतो जिथं भारत आणि इतर ठिकाणची मुलं मोफत रिलेवंट आणि उत्तम शिक्षण घेऊ शकतील आणि आपल्या निवडीची कौशल्ये शिकू शकतील.