सुशांतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’नं बनवलं नवीन रेकॉर्ड, IMDB वर मिळवली आतापर्यंतची टॉपची रेटींग !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा दिल बेचारा या सिनेमाची चाहते आतुरतेनं वाट पहात होते. नुकताच सिनेमा रिलीज झाला आहे. अ‍ॅक्ट्रेस संजना संघी हिनं सिनेमात लिड रोल केला आहे. तर मुकेश छाबडा यानं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. केवळ चाहतेच नाही तर स्टार कास्टही सिनेमासाठी भावूक होताना दिसत आहेत. दि 24 जुलै 2020 (वार- शुक्रवार) हा सिनेमा सायंकाळी 7.30 वाजता डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. या सिनेमाला आता IMDB रेटींग मिळाली आहे. सिनेमानं 10 पैकी 9.8 रेटींग मिळवली आहे जी सर्वोत्तम आहे. आतापर्यंतची ही टॉपची रेटींग आहे.

मुकेश छाबडाचा डायरेक्शनमध्ये डेब्यू
दिल बेचारा सिनेमाच्या माध्यमातून कास्टींग डायरेक्टर मुकेश छाबडानं डायरेक्टर म्हणून डेब्यू केला आहे. हा सिनेमा द फॉल्ट इन आर स्टार्स या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. संजना संघी हिचा देखील हा डेब्यू सिनेमा आहे. सिनेमाचं म्युझिक डायरेक्शनदेखील कमाल आहे. सैफी अली खाननं देखील सिनेमात कॅमिओ रोल केला आहे.

काय आहे सिनेमाची स्टोरी
सिनेमात संजना संघी हिनं एका कॅन्सरग्रस्ताचा रोल साकारला आहे. किजी असं तिच्या रोलचं नाव आहे. सुशांतनं सिनेमात बिंधास्त मुलगा आणि दिलफेक आशिकचा रोल केला आहे. मैनी असं त्याच्या भूमिकेचं नाव आहे. किजी मैनीला अजिताब लाईक करत नसते. परंतु हळूहळू ती तिच्या क्युटनेसवर फिदा होते. परंतु दोघांच्या लव स्टोरीमध्ये किजीचं आजारपण म्हणजे कॅन्सर येतो. किजीची तब्येत बिघडत असताना ती मैनीला इग्नोर करते. तर मैनीला तिला अखेरपर्यंत कशी साथ देतो हे सारं काही सिनेमात पहायला मिळत आहे.

चाहते झाले भावूक
सुशांतचा हा शेवटचा सिनेमा आहे. म्हणून हा सिनेमा पाहताना अनेक चाहत्यांनी त्याला मिस केलं आणि ते भावूक होताना दिसले.