Sushma Andhare On Modi Govt | मोदी सरकारची गॅरंटी हुकूमशाहीकडे नेणारी – सुषमा अंधारे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sushma Andhare On Modi Govt | वारंवार असत्य आणि दिशाभूल करणारी मोदी सरकारची गॅरंटी हुकूमशाहीकडे नेणारी आहे. लोकशाही संपवण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षात फूट पाडली आहे. लोकशाहीत त्यांना विरोधक ठेवायचे नाही. तर दुसरीकडे नागरिक महागाईने त्रस्त आहेत. महिलांची असुरक्षितता वाढली आहे. तरुणांची वाढती बेरोजगारी हा चिंतेचा विषय बनला आहे. मोदी सरकार गुन्हेगारी व भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे. मोदींनी दिलेले कोणतेच आश्वासन पूर्ण केले नाही, मग त्यांना पंतप्रधान कशासाठी करायचे आहे? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shivsena UBT) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

पुणे लोकसभा मतदार संघातील (Pune Lok Sabha) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi), इंडिया आघाडी (India Aghadi) काँग्रेस पक्षाचे (Congress Candidate) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ दत्तवाडी (Dattawadi) येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, विकासाचा एकही मुद्दा भाजपाच्या हातात नाही. त्यामुळे ते हिंदू- मुस्लिम, जात सलोख्यात तेढ निर्माण करीत आहेत. मराठा-ओबीसी यांच्यात संघर्ष निर्माण केला जात आहे. गॅस, पेट्रोलचे दरवाढले आहेत. स्मार्टसिटीच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जात आहे, हीच मोदींची गॅरंटी आहे का?

सुषमा अंधारे म्हणाल्या की,खोट्या जाहिराती करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. भाजपच्या अन्यायाला गाडण्यासाठी सर्वसामान्यांचा चेहरा रविंद्र धंगेकर यांच्यासह इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे सांगून विकासाचे मुद्दे सांगून निवडणुकीला सामोरे जा असे आव्हान भाजपाला यावेळी त्यांनी केले.

याप्रसंगी राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादी काँग्रेसशरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते अंकुश काकडे, काँग्रेसचे जेष्ठ नेतेॲड. अभय छाजेड,माजी महापौर कमलताई व्यवहारे, माजी नगरसेविका सुजाता शेट्टी, अविनाश बागवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, अशोक हरणावळ, बाळासाहेब ओसवाल, किशोर रजपूत, सुरज लोखंडे, राहुल तुपेरे, राष्ट्रवादी काँग्रेसशरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितीन कदम, गणेश नलावडे, वैजिनाथ वाघमारे, मृणालिनी वाणी, स्वप्नील खडके, आपचे सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, मुबंईच्या माजी महापौर निर्मलाताई प्रभावळकर यांच्यासह मित्र पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंधारे म्हणाल्या, विकासाच्या मुद्द्यावर भाजपा मते मागू शकत नाही. भाजपला जनतेला आपण १० वर्षात काय केले हे सांगता आले नाही. तसेचत्यांनी पक्ष फोडले. अनेक पक्षांतील नेते फोडले. एवढेच नव्हे तर बंद पडलेले इंजिन यार्डात आणले. तरीदेखील सातत्याने सगळ्या महायुतीचे प्रचारक “मोदींना पंतप्रधान करायचे आहे” असे सांगत फिरत आहेत. त्यांना कशासाठी पंतप्रधान करायचे आहे तर राज्यघटना बदलून पुन्हा निवडणूक होऊ देयची नाही यासाठी. त्यांना लोकशाहीच नको आहे. सर्व अधिकार आपल्या हातात ठेवायचे आहेत. त्या पुढे म्हणाल्या, भाजपने ज्या विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि ज्यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) धाडी पडल्या त्या लोकांचा ते आता प्रचार करीत आहेत.

पक्ष फोडणारे आणि कारवाईला घाबरून पक्षांतर करणारे उमेदवार मतदारांनी नाकारावे आणि स्वाभिमानी उमेदवारांना निवडून द्यावे. पुण्यातदेखील भाजपा उमेदवार मोदींच्या नावावर मते मागतात. स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुण्याची काय परिस्थिती केली आहे. विकास नाही म्हणून फसव्या जाहिरातबाजी करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. मात्र जनता आता फसणार नाही. रविंद्र धंगेकर यांना संसदेत पाठवून पुण्याचा विकास ते करणार आहेत. सामन्यांचे प्रश्न धंगेकर सोडवणार आहेत. जनता त्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वास अंधारे यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत हंडोरे म्हणाले, रविंद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचा किल्ला ढासळून टाकला आहे. आता धंगेकर लोकसभेत विक्रमी मताने नक्की निवडून येणार. भाजपच्या भूलथापांना नागरिक बळी पडणार नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढली. गॅसची दरवाढ झाली. मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. भाजपची ही फक्त जुमलेबाजी होती. राज्यघटनेने मुलभूत अधिकार, समानता दिली. राज्यघटना दीपस्तंभा सारखी मार्गदर्शन करीत आहे. या सत्ताधाऱ्यांनी न्याय व्यवस्था धोक्यात आणली आहे असे ते यावेळी म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Ajit Pawar | ‘तिकडे मलिदा गँग, इकडे जनता अशी निवडणूक आहे’, रोहित पवारांची अजित पवारांवर चौफेर टीका