Sushma Andhare On Tanaji Sawant | आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – सुषमा अंधारे

पुणे : Sushma Andhare On Tanaji Sawant | नांदेड (Nanded Govt Hospital) आणि घाटी रूग्णालयात (Ghati Hospital) औषधांअभावी अनेक रूग्णांचा जीव गेल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट आहे. विरोधी पक्षांनी देखील राज्य सरकारला धारेवर धरले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या गंभीर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मागणी केली की, या घटनेला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Sushma Andhare On Tanaji Sawant)

सुषमा अंधारे म्हणाल्या, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधांअभावी निष्पाप नागरिकांचा बळी गेला. राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांचे नाराजी नाट्य सोडवण्यासाठी दिल्लीला गेलेत. (Sushma Andhare On Tanaji Sawant)

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दीडशे बैठका घेतल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत अनेकदा सांगतात. पण, त्यांनी सामन्याच्या आरोग्यासाठी एक जरी बैठक घेतली असती, तर आज निष्पाप नागरिकांचा बळी गेला नसता. त्यामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी अंधारे यांनी केली.

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, करोना काळात उद्धव ठाकरे यांनी घरी बसून काम केल्याचे अनेक जण बोलतात. पण उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यांनी आरोग्य व्यवस्था चोख सांभाळली. तर तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीदेखील चांगले काम केले. त्या कामाची दखल जागतिक स्तरावर घेतली होती. देशातील पाहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव होते. विद्यमान मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

नांदेड शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता शाम वाकोडे यांना खासदार हेमंत पाटील यांनी शौचालय साफ करण्यास
लावल्याप्रकरणी त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अंधारे म्हणाल्या, हेमंत पाटील यांना एवढी
मस्ती येते कुठून. आदिवासी अधिकाऱ्याला स्वच्छता करायला लावता. नांदेडमधील प्रकरण झाकण्यासाठी हे केले आहे.

अंधारे पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांबाबत एखाद्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्यास ताबडतोब
त्या व्यक्तीवर कारवाई होते. पण खासदार हेमंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होऊनदेखील राज्याच्या गृहमंत्र्यांनी
कारवाई का केली नाही?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | येरवडा कारागृहात कैद्यामध्ये पुन्हा राडा ! कैद्यावर धारदार वस्तूने वार

ACB Trap News | 10 हजार रुपये लाच घेताना विस्तार अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात