Sushma Andhare | अब्दुल सत्तारांवर कारवाई केली, मग गुलाबराव पाटील यांच्यावर का केली नाही?, सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्या विरोधात अर्वाच्च भाषा वापरली तरी राज्य महिला आयोगाकडून (State Commission for Women) त्यावर कारवाई करण्यात आली नाही. रुपाली चाकणकरांना (Rupali Chakankar) आपण या संदर्भात दोन वेळा फोन केला पण त्यांनी तो उचलला नाही, असा आरोप सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे. जी कारवाई सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रकरणात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर केली तशी कारवाई आपल्या प्रकरणात गुलाबराव पाटील यांच्यावर का केली नाही, असा सवाल सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रुपली चाकणकर यांना विचारला आहे.

सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, मी महिला आयोगावर टीका करत नाही, तर महिला आयोगाच्या ही गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छिते की त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाई करावी. मी रुपाली चाकणकर यांना दोनवेळा गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही.

अंधारे पुढे म्हणाल्या, माझा महिला आयोगालाही सवाल आहे की जर अब्दुल सत्तार यांना तुम्ही आक्षेपर्ह
वक्तव्याविरोधात नोटीस बजावता तर गुलाबराव पाटील यांना नोटीस का बजावत नाही.
दोघेही गुन्हेगारच आहेत. राज्य महिला आयोगाने सिलेक्टिव्ह (Selective) वागू नये,
फक्त सत्तारांना नोटीस काढू नये. काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख नटी असा केला होता. यावरुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title :-  Sushma Andhare | sushma andhare alleges that despite calling rupali chakankar twice to take action against gulabrao patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन राजकीय आखाडा तापला ! देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडला दिला थेट इशारा (व्हिडिओ)

Rishabh Pant | स्टेडियम मध्ये टवाळ प्रेक्षकांनी ऋषभ पंतला उर्वशीच्या नावाने डिवचलं अन्…