Sushma Andhare | ‘मी पक्षाने सांगितले, तर राजीनामा देण्यास तयार आहे, पण…’ – सुषमा अंधारे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी महाराष्ट्रातील संतांवर केलेल्या भाषणावर त्यांच्याविरोधात राज्यभर गुन्हे दाखल केले जाण्याची शक्यता आहे. विश्व वारकरी सेनेने त्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. दोन दिवसांपूर्वी विश्व वारकरी सनेचे गणेश महाराज शेटे यांनी पश्मिम बंगालला एक शपथ घेतली. सुषमा अंधारे (Sushma Andhare) ज्या पक्षात असतील, त्या पक्षाला मत न देण्याची प्रतिज्ञा गणेश महाराज शेटे यांनी केली. त्यामुळे अंधारे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अंधारेंच्या शिवसेनेतून राजीनाम्याची मागणी विश्व वारकरी सेनेतून जोर धरत आहे. त्यामुळे आता सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) त्यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे.

माझ्यासाठी माझा पक्ष महत्वाचा आहे. मला पक्षासाठी काम करायचे असेल, तर मी कुठुनही करू शकते. मी पक्षाबाहेरून काम केले, तर भाजपला पळता भुई थोडी होईल. पक्षाने मला आदेश दिला, तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र, माझा राजीनामा मागणारे आधी राज्यपालांचा राजीनामा मागणार का? माझी जुनी भाषणे सध्या फिरवली जात आहेत. मग हे लोक जे आता माझ्या भाषणांवर आक्षेप घेत आहेत, ते मधली 10 – 15 वर्षे कुठे होते? असे प्रश्न सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपस्थित केले आहेत.

वारकरी संप्रदायाची सुषमा अंधारे यांनी माफी मागितली आहे.
तरी देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली जात आहे.
विश्व वारकरी सेनेच्या तुकाराम चौरे यांनी ही मागणी केली.
तसेच राज्यभर सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी देखील वारकरी सेनेने केली आहे.
वारकरी संप्रदायाचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही.
राजकीय नेत्यांनी वारकरी संप्रदायाच्या संतांवर अशा पद्धतीची विधाने करू नयेत.
त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल.
तसेच राज्यातील 36 जिल्हे आणि 270 तालुक्यात पसरलेल्या या संघटनेच्या कार्यकर्त्यांना गावोगावी
सुषमा अंधारे यांच्याविरोधात तक्रारी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे जगन्नाथ महाराज यांनी सांगितले.

Web Title :-  Sushma Andhare | sushma andhare the leader of the thackeray group has stated that she is ready to resign if the party gives an order

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashish Shelar | ‘मविआ’च्या मोर्चाला भाजप देणार ‘माफी मांगो’ आंदोलनाने उत्तर, आशिष शेलारांची माहिती (व्हिडिओ)

MP Sanjay Raut | ‘ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी…’, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल