MP Sanjay Raut | ‘ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी…’, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गटातील (Thackeray Group) अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करत आहेत. नाशिकमध्ये माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना विचारले असता ते म्हणाले, शिंदे गटात गेलेल्या लोकांना श्रद्धा, निष्ठा हा विचार नाही. जे गेले आहेत, त्याचा सगळ्यांचा व्यवहार आणि व्यवसाय दलाली असल्याचे संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सांगितले. तसेच ज्याचं सरकार तिकडे हे लोक जात असतात. 2024 ला ही सगळीच्या सगळी झुंड परत आमच्या दारात उभी राहिलेली दिसेल फक्त त्यांच्या गळ्यातील दुपट्टे बदलतील असे राऊत म्हणाले.

राज्यातील जे काही लोकं शिंदे गटात गेली आहेत, एकतर ती दलाल (Broker) आहेत, त्यांचे दोन नंबरचे धंदे आहेत. तसेच लालच दाखवून त्यांच्यावर दबाव आणून प्रवेश करुन घेतले जात असल्याचा आरोप संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला. या सर्वांचे दारु, जुगार, मटका असे धंदे आहेत. बनावट दारुचा व्यवसाय करणारे काही लोक आहेत. त्यांना कोणत्या पक्षाशी निष्ठा नसल्याचे राऊत यांनी सांगितले. जे लोक त्यांच्याकडे गेले याचं आम्हाला दु:ख नाही. ज्या दिवशी हे सरकार पडले, त्या दिवशी हे लोक आमच्या दारात उभे असतील असेही राऊत यांनी सांगितले.

राज्यात घटनाबाह्य सरकार

राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत. हा महाराष्ट्रावर खूप मोठा अन्याय असल्याचे राऊत यांनी म्हटले. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात महाराष्ट्र प्रेमींचे मोर्चे निघाले होते. तशाप्रकारचा मोर्चा उद्या निघणार आहे. घटनाबाह्य पद्धतीचे सरकार महाराष्ट्रात बसले आहे. आम्ही कोणतंही काम घटनाबाह्य (Constitution) करत नाही. हे सरकार लोकशाही पद्धतीला विरोध करत असल्याचे राऊत म्हणाले. आम्ही लोकशाही मार्गाने चाललो आहोत. त्याच मार्गाने आम्ही तुम्हाला सत्तेवरुन खाली खेचू असेही राऊत म्हणाले.

…तर वेगळे परिणाम होतील

उद्या शिवसेना (Shiv Sen), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यासह समविचारी पक्षांचा
मुंबईत मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला अद्याप सरकारकडून परवानगी मिळालेली नाही.
याबाबत संजय राऊत म्हणाले, मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही.
मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाला परवानगी मिळणार.
जर तसे झाले नाहीतर त्याचे परिणाम वेगळे होतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

Web Title :- MP Sanjay Raut | shivsena leader sanjay raut criticism on shinde group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma Andhare | सुषमा अंधारेंचा भाजपाला इशारा; म्हणाल्या ‘तर मी सगळ्या भाजपवाल्यांची….’

Maharashtra Politics | ‘राज ठाकरे आमच्यासोबत आले तर…’, शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान