सुषमा स्वराज यांच्या निधनामुळं USचे ‘राष्ट्राध्यक्ष’ ट्रम्प यांची मुलगी इवांका ‘भावुक’ ; म्हणाली, ‘महिलांच्या ‘चॅम्पियन’ नेत्याला आपण गमावलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि धाडसी राजकारणी म्हणून त्या परिचित होत्या. सुषमा स्वराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात पुर्णवेळ परराष्ट्र मंत्री राहिल्या. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले, मात्र काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली. अतिशय नम्र आणि सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये लोकप्रिय असलेला हा चेहरा भारतातील नागरिकांच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्यावर काल दिल्लीत अंतिम संस्कार करण्यात आले.

६७ वर्षीय सुषमा स्वराज यांना विविध स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात आली. विविध क्षेत्रातील लोकांनी आणि मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या. याचबरोबर जगभरातून देखील त्यांना अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रंप हिने देखील सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. तिने ट्विट करत स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. तिने म्हटले की, भारताने एक समर्पित आणि लोकजनाधार असलेला नेता गमावला आहे.

सुषमा स्वराज या जगभरातील महिलांसाठी एक प्रेरणा होत्या. त्यांच्याशी माझी ओळख असणे माझ्यासाठी ती सन्मानाची गोष्ट होती. त्याचबरोबर अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पीओ यांनी देखील स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले कि, माझ्या मैत्रीण आणि भारताच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांच्या निधनाने दुःख झाले. भारतीय जनता आणि स्वराज यांच्या परिवाराप्रती मी संवेदना व्यक्त करतो.
दरम्यान, मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाल्यानंतर काल त्यांच्यावर दिल्लीतील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त