सुष्मिता सेनच्या भावाच्या लग्नाचे फोटो व्हायरल ; बॉयफ्रेंडसोबत दिसली सु्ष्मिता सेन

0
7
Sushmita-Bro

मु्ंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका महिन्यापूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेनने घरी सनई वाजण्याची खुशखबर दिली. त्यानंतर ७ जून रोजी सुष्मिताचा भाऊ राजीव सेनने टीव्ही अॅक्ट्रेस चारू असोपासोबत लग्न केलं. दोघांनीही कोर्ट मॅरेज केलं. चारूने या वर्षी जानेवारी मध्ये आपल्या नात्याचा खुलासा केला होता.

कोर्ट मॅरेजनंतर राजीव आणि चारुने १६ जून रोजी पारंपरिक रितीरीवाजांनुसार गोव्यात ७ फेरे घेतले. याच लग्नाचे काही न पाहिलेले फोटो समोर आले आहेत. या कुटुंबातील सर्व सदस्य यात दिसत आहेत.

सु्ष्मिता सेन फोटोंमध्ये पिवळ्या सूटमध्ये दिसत आहे. यावेळी रोहमन शॉलनेही पिवळ्या रंगाचा मॅचिंग कुर्ता घातला आहे. राजीव आणि चारू हेदेखील यात दिसत आहेत. सुष्मिताचे आईवडिलही तुम्ही फोटोत पाहून शकता.

लग्नाचे विधी राजस्थानी आणि बंगाली रिती रिवाजांनी पार पडले. गोव्यात ३ दिवस झालेल्या ग्रँड सेरेमनीमध्ये साखरपुडा, मेहंदी आणि संगीत असे कार्यक्रम पार पडले. लग्नाचे विधी ख्रिश्चन रितीरीवाजाने झाले.
image.png
२८ वर्षीय चारू टीव्ही अॅक्ट्रेस आहे. चारू ये रिश्ता क्या कहलाता है, मेरे अंगने में, संगिनीमध्ये दिसली आहे. ६ महिने राजीव आणि चारू एकमेकांना डेट करत होते. चारूने मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता.
image.png

लाईमलाईटपासून दूर असणार राजीव ज्वेलरी बिजनेसमन आहे. दुबईसहित देशातील अनेक भागात त्याचा करोडोंचा कारभार आहे. राजीव दुबईतच असतो. तो अधुन मधून मुंबईत येत असतो.

image.png
काही दिवसांपूर्वीच राजीवने दिल्लीत ज्वेलरी शोरूम सुरु केलं आहे. रेने असं याचं नाव आहे. सुष्मिताच्या दत्तक घेतलेल्या मुलीचं नाव रेने आहे. राजीव अनेकदा फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक करतानाही दिसला आहे.