Sushmita Sen | सुष्मिता सेनने सांगितला हार्ट अटॅक नंतर आयुष्याबद्दल बदलेला दृष्टीकोन; “आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देते तेव्हा…”

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) ही तिच्या आगामी ‘ताली’ या चित्रपटाच्या टीझरमुळे (Taali Movie Teaser) व पोस्टरमुळे चर्चेत आली आहे. सुष्मिताचा एक वेगळाच अंदाज या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. सुष्मिताच्या या नव्या चित्रपटातील लूकवर व तिच्या जबरदस्त अभिनयावर चाहते खूश झाले आहेत. अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र याच वर्षी अभिनेत्री सुष्मिता सेन हिला हार्ट अटॅक (Sushmita Sen Heart Attack) येऊन गेल्याने अनेकांनी तिच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली आहे. सुष्मिताने (Sushmita Sen) यावर तिचे मत मांडले आहे.

अभिनेत्री सुष्मिता सेन ही सोशल मीडियावर सक्रिय असते. मार्च महिन्यामध्ये तिला हार्ट अटॅक येऊन गेल्याचे सर्व नेटकऱ्यांना जाहीरपणे सांगितले होते. तिने हे सांगितल्या नंतर अनेकांना धक्काच बसला. तिला एंजियोप्लास्टी ट्रीटमेंट (Angioplasty Treatment) देखील करावी लागली होती. तिचे स्टेंट प्लेसमेंट (Stent Placement) देखील करण्यात आले. यानंतर ती आता कामाला देखील लागली असून तिने या हृदय विकारच्या झटक्याबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे. तिने सांगितले आहे की तिला आता या आजाराची भिती वाटत नाही.

अभिनेत्री सुष्मिता सेन हिला जेव्हा हृद्यविकाराचा झटका आला तेव्हा ती ‘आर्या सीजन 3′ (Arya Season 3) या वेबसिरिजचे शूटिंग करत होती. मात्र या शारिरिक कारणांमुळे त्यांना शुटिंग थांबवावे लागले. आता सुष्मिताने बरी झाली असून तिच्या हृदयरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर तिने पुन्हा नव्या उमेदने कामास सुरुवात केली आहे. परत आल्यानंतर तिने ‘आर्या सीजन 3′ चे शुटिंग तर पूर्ण केलेच, त्याचबरोबर ‘ताली’ या चित्रपटाचे देखील तिने शुटिंग केले आहे.

एका वृत्तवाहिनाला अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिने मुलाखत दिली. यामध्ये तिने हा हृद्यविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर तिचे आयुष्य कसे चालले आहे आणि तिला आयुष्याबद्दल काय वाटते हे मनमोकळेपणाने मांडले आहे. ती म्हणाली की, ‘ही एक वेळ आहे, जी निघून जाईल. माझ्या आयुष्यातील या टप्प्याने मला गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने हॅन्डल करायला शिकवलं. जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देते तेव्हा तुम्ही तिचा आदर केला पाहिजे.” सुष्मिताच्या या विचारांवर आणि आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहण्याबद्दल चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. सुष्मिता सेनच्या धमन्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे 95 टक्के ब्लॉकेज झाले होते. तिच्या या गंभीर समस्येमुळे तिला कामातून ब्रेक घ्यावा लागला होता. पण, आता पुन्हा एकदा सुष्मिता सेनने सिनेविश्वामध्ये कमबॅक केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS on Priyanka Chaturvedi | प्रियंका चतुर्वैदींवरील विधानावरुन मनसे संतापली, ‘शिर’साटांना थेट इशारा