Suspension | नगर जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांचे तडकाफडकी निलंबन; SP मनोज पाटील यांची कारवाई

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Suspension |कर्तव्यात कसूर करत असल्याचे आढळून येत असल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील (Sangamner City Police Station) पोलीस उपनिरीक्षक रोहिदास अशोक माळी (police Sub-Inspector Rohidas Ashok Mali) यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (superintendent of police Manoj Patil) यांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई (Suspension action) केली आहे. या कारवाईमुळे (Suspension) पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळा हे संमनेर शहर पोलीस ठाण्यात काही वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ते वेळोवेळी रजेवर गेले होते. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख (Police Inspector Mukundrao Deshmukh) हे नाराज होते. त्यांनी याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने (Sub-Divisional Police Officer Rahul Madane) यांना माहिती दिली होती. राहुल मदने यांनी उपनिरीक्षक माळी यांच्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना अहवाल पाठवला होता. या अहवालाची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (superintendent of police Manoj Patil) यांनी दिनांक 15 जुलै रोजी आदेश काढून उपनिरीक्षक रोहिदास माळी यांना तडकाफडकी निलंबित (Suspension) केले.

‘या’मुळे केले निलंबित

पोलीस अधीक्षक कार्यालयातून काढण्यात आलेल्या निलंबनाच्या आदेशात माळी यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामकाज न करता स्वत:च्या मनाप्रमाणे वागणे,
वरिष्ठांना गुन्हे निर्गती करणेबाबत वेळोवेळी सूचना देऊनही या गुन्ह्याचा तपास न करता वरिष्ठांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे. ड्युटीवर वेळेत न येणे,
कोरोना उपचाराबाबत वरिष्ठांना कोणतीही माहिती न देणे,
कोरोना काळात रजेवर असतानाही पोलीस स्टेशन गुन्हे प्रकरणाचे कामकाज केल्याच्या नोंदी घेऊन बेकायदेशीर काम करणे असा ठपका माळी यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
याची चौकशी सरु असून या चौकशीत हस्तक्षेप करता येऊ नये यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असे आदेशात म्हटले आहे.

Web Title : Suspension |suspension of police sub inspector Rohidas Mali,
Action of SP Manoj Patil

 

हे देखील वाचा

Mumbai : DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’

Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !

El-Colacho Festival | ‘इथं’ भररस्त्यात मुलांना झोपवून वरून उडी मारतो व्यक्ती,
धर्माच्या नावावर भयंकर परंपरा सुरू