अखेर ‘त्या’ दोन पोलिस अधिकार्‍यांसह 5 पोलिसांवरील निलंबन मागे; सोमवारी झाली होती ‘सस्पेन्शन’ची कारवाई

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – कोणतेही कायदेशीर आदेश नसताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) यांच्या जाफराबाद Jafrabad येथील जनसंपर्क कार्यालयाची झडती घेणा-या पाचही पोलिसांचे निलंबन (Police suspension) अखेर मागे घेण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी दिले आहे. माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Shiv Sena leader Arjun Khotkar) यांनी दिलेल्या निवेदनानंतर हे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

जाफराबाद येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) यांचे जनसंपर्क कार्यालय आहे.
या कार्यालयाची 11 जून रोजी पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, Sub-Inspector of Police Nitin Khushal Singh Kakarwal युवराज सुभाष पोठरे Yuvraj Subhash Pothare हे दोन पोलीस उपनिरीक्षक आणि जमादार मंगलसिंग रायसिंग सोळंके, सचिन उत्तमराव तिडके आणि महिला पोलीस कर्मचारी शबाना जलाल तडवी Shabana Jalal Tadvi यांनी कायदेशीर आदेश नसताना झाडाझडती घेतली.
याप्रकरणी दानवे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती.
चौकशी अंती पाचही पोलीसांवर शिस्तभंगाचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक विनायक देशमुख (Superintendent of Police Vinayak Deshmukh) यांनी सोमवारी निलंबन केेेले होते.
या निर्णयाने संपूर्ण पोलीस दल हादरले होते.

6th Pay Commission | सर्व्हिस आणि रिटायर्ड कर्मचार्‍यांसाठी आली मोठी खुशखबर, 1 जुलैपसून लागू होणार सर्व नियम

याबाबत शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली.
खोतकर यांचे गृहमंत्र्यांनी सर्व प्रकरण ऐकून घेतले.
यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची कोणतीच चूक नव्हती.
अशा प्रकारे जर पोलिसांवर चुकीची कारवाई होत असेल तर पोलिसांनी काम कसे करावे,
असा सवाल खोतकरांनी वळसे पाटील यांना केला.
त्यानंतर वळसे पाटील यांनी हे निलंबन (Police suspension) मागे घेण्यात येईल, असा शब्द दिला होता.
त्यानुसार आज संबंधित पाचही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : suspension two sub police inspector and three policemen who raided office union minister raosaheb danve has been withdrawn

हे देखील वाचा

Dog instructor | राज्यातील पहिल्या महिला डॉग इन्स्ट्रक्टर सुप्रिया किंद्रे यांचा सत्कार

PM Narendra Modi । पीएम मोदींनी बोलावली जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कलम 370 नंतर आता कोणता निर्णय ?