धक्कादायक ! मोबाईलच्या नादापायी विद्यार्थ्याने दिला जीव

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाइन – अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मोबाईल घेण्यासाठी पालक पैसे देत नाहीत म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना छावणीजवळील आहेरवाडी शिवारात घडली. रागावून मित्रांकडे गेला असेल असे समजून पालकांनी वाट बघितली. मात्र तीन दिवस उलटूनही मुलगा घरी न आल्याने त्यांनी हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले आणि मुलाने आत्महत्या केल्याचे त्यांना समजले.

लक्ष्मीकांत आनंद पाईकराव (२० रा. भीमनगर, भावसिंगपुरा) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आठ दिवसांपूर्वी सिडको एन २ मध्ये राहणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने अभ्यास झेपत नसल्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी विद्यार्थी आत्महत्या समोर आली आहे.

छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेरवाडी येथील सागर फत्तेलष्कर यांनी छावणी पोलिसांना माहिती दिली की, वन जमिनीच्या जागेत झाडाला एका युवकाने गळफास घेतला. यावेळी छावणी ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब मुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन युवकाला फासावरून उतरवून घाटी रुग्णालयात दाखल केले. युवकाजवळ कोणतीही वस्तू आढळली नाही. त्यामुळे त्याचे नाव, गाव शोधणे अवघड झाले होते. पोलिसांनी युवकाची ओळख पटविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. दोन दिवसांनी आनंद पाईकराव हे आपला मुलगा हरवल्याची तक्रार देण्यासाठी छावणी पोलीस ठाण्यात आले असता त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी त्यांना खातरजमा करून सांगितले.

‘इटालियन जॉब’ चित्रपटाप्रमाणे त्यांनी लुटले सोन्याचे शोरुम