Swapnil Joshi | मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने व्यक्त केली खंत; म्हणाला ‘या’ अभिनेत्रीबरोबर करायचे होते काम

पोलीसनामा ऑनलाइन : मराठी मनोरंजन सृष्टीत चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी (Swapnil Joshi). त्याचे नाव अनेक आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे. सध्या स्वप्निल ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत दिसत आहे. सध्या तो स्वप्निल जोशीने शेअर केलेल्या हॅशटॅग #AskSJ यामुळे चर्चेत आहे. शाहरुख खानच्या पावलांवर पाऊल टाकत त्यांनी ही संकल्पना सुरू केली आहे. चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. आता चाहत्यांनी देखील स्वप्नीलला अनेक प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांवर स्वप्निलने (Swapnil Joshi) देखील उघडपणे उत्तर दिले आहे. यातील एक प्रश्न सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना स्वप्निलने खंत देखील व्यक्त केली आहे.

#AskSJ हॅशटॅगवर एका चाहतीने स्वप्निलला एक हटके प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना स्वप्निल भावुक देखील झाला होता. यावेळी चाहतीने स्वप्निलला विचारले की “मराठी मनोरंजनसृष्टीत अशी एक कुठली अभिनेत्री आहे जिच्यासह काम करण्याची इच्छा आहे पण अजून तो योग आला नाही?” यावर उत्तर देताना स्वप्निल म्हणाला, “मला स्मिता पाटील यांच्याबरोबर एक फ्रेम तरी शेअर करायची होती. मात्र ती आता राहिली… दुर्दैवाने तो योग आता कधीच येणार नाही”. स्वप्नीलचे हे उत्तर सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

याचबरोबर या सत्रात स्वप्नीलने (Swapnil Joshi) तू तेव्हा तशी या मालिकेवर टीका करणाऱ्या नेटकाऱ्यानाही
चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
यावेळी एका युजरने स्वप्निलला “चांगल्या मालिका करत जा” असा सल्ला दिला होता,
त्या युजरला उत्तर देताना स्वप्निल उलट त्याला प्रश्न करत विचारले की “चांगलं काय हे कोण ठरवणार?”
स्वप्निलच्या प्रश्नावर उत्तर देताना तो यूजर म्हणाला “प्रेक्षक ठरवतील हे बरोबर आहे पण एक चांगला
अभिनेता म्हणून तुला अशा मालिकेत पाहायला आवडत नाही” यावर स्वप्निलने ही या गोष्टीची नोंद घेतल्याचे दिसून आले .

Web Title :- Swapnil Joshi | swapnil joshi says my extreme bad luck to not work with smita patil in ask me anything session like

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरासमोर धडक होऊन कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

Nashik Crime News | पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

ICC Ranking | अष्टपैलू क्रिकेटर्समध्ये जडेजा अव्वल स्थानी विराजमान; टॉप 5 मध्ये ‘या’ 3 भारतीयांचा समावेश