Swara Bhasker | ट्रोलिंगला वैतागून स्वरा भास्करने घेतला मोठा निर्णय, उचललं ‘हे’ गंभीर पाऊल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) तिच्या बेधडक वागण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या अशा बेधडक वागण्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा (Trolling) देखील सामना करावा लागत आहे. स्वरा भास्कर (Swara Bhasker) आता पुन्हा एका नवीन कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने ट्रोलिंगला वैतागून एका सोशल मीडिया इंफ्लुएंसर (Social media influencers) आणि यूट्यूबरच्या (YouTuber) विरोधात तक्रार (FIR) दाखल केली आहे.

स्वरा भासकरने ((Swara Bhasker)) यूट्यूबर एल्विश यादव (Youtuber Elvish Yadav) याच्या विरोधात दिल्लीतील वसंत कुंजमध्ये (Vasant Kunj Police Station Delhi) तक्रार दाखल केली आहे. युट्यूबर यादव याने माझी प्रतिमा, प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप स्वराने केला आहे.
याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी स्वरा सोमवारी पटियाला हाऊस कोर्टात (Patiala House Court) गेली होती.

स्वराने म्हटले की, या यूट्यूबरने तिच्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील सीनचा वापर करुन तिची फक्त इमेज खराब केली नाही
तर सोशल मीडियावर देखील तिच्या विरुद्ध हॅशटॅग ट्रेंड (Hashtag trend) केले आहेत.
यामुळे समाजातील तिची प्रतिष्ठा मलीन झाली आहे. त्यामुळे हे पाऊल उचलले असल्याचे स्वराने सांगितले.

एफआयरामध्ये तिने आयटी IPC कलम 354D (पाठलाग करणे), आयपीसी कलम -509 आणि IT अधिनियम कलम 67 (इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे अश्लील साहित्य प्रकाशित करणे)
अंतर्गत यूट्यूबरवर आरोप केले आहेत.
दरम्यान स्वराच्या तक्रारीनंतर यूट्यूबरने (YouTuber) एक पोस्ट शेअर करत म्हटले की, स्वरा भास्करने (Swara Bhasker) त्याच्यावर चूकीचे आणि खोटे आरोप लावले आहेत.

 

Web Title : Swara Bhasker | Annoyed by trolling, Swara Bhaskar took a big decision and took a serious step

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bitcoin | बिटकॉइनने एक आठवड्यात घेतली 16% आघाडी ! 57000 डॉलरच्या पुढे, इतर डिजिटल टोकन आले खाली

Pune News | सक्सेस स्क्वेअर सोसायटीत रंगला भोंडल्याचा कार्यक्रम

PM Narendra Modi | मानवाधिकाराच्या नावावर काही लोक खराब करतात देशाची प्रतिमा, राहावे लागेल सावध – पीएम नरेंद्र मोदी