Swara Bhasker | स्वरा भास्करचे ‘ते’ जुने ट्विट व्हायरल; “आधी म्हटली होती भाई म्हणत…” नेटकऱ्यांनी केले ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे देखील ओळखली जाते. स्वरा तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. आता स्वरा पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे तिने समाजवादी पार्टीचा नेता फहद अहमदशी लग्नगाठ बांधली आहे. आता तिच्या या लग्नानंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. स्वराने (Swara Bhasker) ट्विटर आणि इंस्टाग्राम वर फोटो शेअर करून तिच्या लग्नाची माहिती चाहत्यांना दिली आहे. आता तिच्या या पोस्ट नंतर तिचे काही जुने व्हिडिओज आणि ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. तिचे काही जुने व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिला त्यावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

स्वराने (Swara Bhasker) याआधी फहद अहमदला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक ट्विट केले होते. आता स्वराचे हे ट्विट पुन्हा चर्चेत आले आहे. यावेळी स्वराने फहद सोबतचा सेल्फी शेअर केला होता. तर या ट्वीटमध्ये स्वराने फहदला भाई म्हटल्याने आता ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. यावेळी स्वराने ट्विट शेअर करत म्हटले की, “जन्मदिन मुबारक फ़हाद मियाँ! भाई का कॉन्फ़िडेंस बरकरार रहे @FahadZirarAhmad खुश रहो, आबाद रहो.. उम्र हो रही है अब शादी कर लो! Have a great birthday & a fantastic year dost! ”

तर तिच्या या ट्वीटला फहद अहमदने देखील रिप्लाय दिल्याने तोही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. फहद हा समाजवादी पार्टीचा नेता आहे. स्वराने फहद सोबत जानेवारी मध्येच कोर्ट मॅरेज केले होते आणि आता दोघे रीतीनुसार लग्न करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर स्वरा आणि फहदचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

 

Web Title :- Swara Bhasker | swara bhaskar get troll over her old tweet photo with fahad ahmad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rudraksh Mahotsav in Sehore | धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये झालेल्या धक्काबुक्कीत बुलडाण्यातील 3 महिला बेपत्ता

Pune Crime News | पत्नीचा गळा दाबून खून करुन पतीने विष प्राशन करुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना