home page top 1

‘तारक मेहता..’ फेम बबीता आणि जेठालालचा डान्स व्हायरल ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीवरील तारक मेहाता का उलटा चष्मा ही मालिका खूपच लोकप्रिय आहे. या सिनेमातील प्रमुख भूमिका जेठालाल याचं बबीतावरील छुप प्रेम सर्वांनाच माहिती आहे. मुनमुन दत्ताने बबीताची भूमिका साकारली आहे. रोलमध्ये मॉडर्न दिसणारी बबीता रिअल लाईफमध्येही खूपच मॉडर्न आहे. नुकताच मुनमुनचा हा मॉडर्न अवतार इंस्टाग्रामवर पाहायला मिळाला. नुकताच तिने पडद्यामागील सीनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत मुनमुन शोच्या सेटवर डान्स परफॉर्मंसची तयारी करताना दिसत आहे. गोलमालमधील गाण्यावर ती थिरकताना दिसत आहे. जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी तिच्यासोबत थिरकत आहेत. यावेळी मिस्टर अय्यरही स्टेजवर दिसतात. त्यांनी लाल रंगाचं जॅकेट घातलं आहे. बबीताचा डान्स खूपच रोमांचक दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मुनमुन दत्ता म्हणते, “रिसेट गाण्याच्या शुटचं बीटीएस

या व्हिडीओत मिस्टर अय्यर आणि जेठालाल दोघेही हटके लुकमध्ये डान्सची तयारी करताना दिसत आहे. जेठालाल ब्राऊन कलरच्या जॅकेटमध्ये दिसत आहेत. बबीताही हॉट अंदाजात डान्स मूव्ह्स करत आहे. शोमध्ये दयाबेनचा वारंवार उल्लेख होताना दिसत आहे. यावरून अंदाज लावला जात आहे की, लवकरच दयाबेन शोमध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे.

 

 

Loading...
You might also like