…..तर विकास बहलविरोधात कडक कारवाई करा : हृतिक रोशन

ADV

मुंबई:  पोलीसनामा आॅनलाईन 

तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर अनेक महिला पुढे येत आहेत आणि त्यांना आलेले अनुभव शेअर करत आहेत. तनुश्री दत्ताला अनेक अभिनेत्रींने तसेच इतर महिलांनाही चांगलाच सपोर्ट दर्शवला. सध्या ट्विटरवर ‘मी टू’ #MeToo असा ट्रेंडही सुरू आहे. अनेक जण त्यांना आलेल्या अशा प्रकारच्या अनुभवाबद्दल बोलत आहेत. दिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाल्यानंतर आता त्याच्याविरोधात अभिनेता हृतिक रोशन मैदानात उतरला आहे. हृतिकच्या आगामी ‘सुपर ३०’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल करत आहे. त्यामुळे त्याच्यावर असलेल्या आरोपांची पडताळणी करून गरज भासल्यास कडक कारवाई करा अशी विनंती हृतिकने निर्मात्यांना केली आहे.

ADV

[amazon_link asins=’B0784D7NFX,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’925de408-cb02-11e8-8013-43d476aeef2a’]

‘लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप असलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत मी काम करणं अशक्य आहे. मला त्या घटनेबाबत फारशी माहिती नाही. पण मी निर्मात्यांना विनंती केली आहे की योग्य ती माहिती काढून गरज भासल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करा,’ असं हृतिकने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं. ‘मी टू’ #MeToo मोहिमेचं समर्थन करत महिलांनी पुढे येऊन अशा घटनांबद्दल बोललं पाहिजे आणि दोषींना शिक्षा ही झालीच पाहिजे असं मत हृतिकने मांडलं.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’21cf6341-cb03-11e8-81e9-356ff26038f2′]

दरम्यान अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांना अभिनेते नाना पाटेकर यांनी उत्तर दिलं. ‘जे खोटं आहे ते खोटचं असतं’, असं म्हणत नानांनी तनुश्री दत्ताचे आरोप सपशेल फेटाळून लावले. नाना पाटेकर मुंबईत परतले तेव्हा मुंबई विमानतळावर पत्रकारांनी त्यांना गाठल्यावर नानांनी तनुश्री दत्ताचे आरोप फेटाळून लावले. आज मुंबईत दाखल झाले होते. अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सोमवारी अखेर मीडियाला सामोरे गेले. यावेळी माझ्या वकिलाने मला मीडियाशी बोलण्यास मनाई केली आहे, असे स्पष्ट करताना अधिक बोलणं नानांनी टाळलं.