Taliban Rules for Women | तालिबानने महिलांसाठी बनवले हे 10 नियम, घट्ट कपड्यांपासून सँडल घालण्यापर्यंत BAN

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  तालिबानी शासनात (Taliban Rules for Women) महिलांसाठी असे कठोर नियम-कायदे (Taliban Rules for Women, Girls) बनवले जातात, जे मानवाधिकारांचे थेट उल्लंघन आहे. शरिया कायद्यानुसार महिलांचे सर्व अधिकार हिसकावले जातात. 2001 मध्ये जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे शासन होते, महिलांनी (Afghan) खुप काही सहन केले आहे. पुन्हा एकदा रोजच्या जगण्यात महिलांना आणि मुलींना त्याच नियमात आता राहावे लागणार आहे.

तालिबानचे ते 10 नियम, जे नरक बनवतात महिलांचे जीवन

महिला रस्त्यावर कोणत्याही जवळच्या नातेवाईकाशिवाय बाहेर पडू शकत नाहीत.

महिलांना घराच्या बाहेर पडण्यासाठी बुरखा घालावा लागेल.

पुरुषांना महिलांच्या येण्याची चाहूल लागू नये, यासाठी हाय हिल्स घालू नये.

सार्वजनिक ठिकाणी अनोळखींसमोर महिलेचा आवाज ऐकू येऊ नये.

ग्राऊंड फ्लोअरच्या घरांमध्ये खिडक्यांच्या काचांना पेंट असावा, जेणेकरून घरातील महिलांना बाहेरचे दिसू नये.

महिला फोटो काढू शकत नाहीत, त्यांचे फोटो वृत्तपत्र, पुस्तके आणि घरात लावलेले दिसू नयेत.

महिला शब्द कोणत्याही जागेच्या नावातून हटवावा.

घराची बाल्कनी किंवा खिडकीत दिसू नयेत महिला

महिलांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये.

महिला नेल पेंट लावू शकत नाहीत, तसेच त्या स्वताच्या इच्छेने विवाहाचा विचार करू शकत नाहीत.

 

नियम मान्य केले नाही तर भयंकर शिक्षा (Talibani Punishment)

तालिबान आपल्या भितीदायक शिक्षांसाठी खुप कुप्रसिद्ध आहे. महिलांसाठी बनवलेले नियम कायदे जर कुणी मोडले तर त्यास क्रुर शिक्षेचा सामना करावा लागतो.

तालिबान राज्यात महिलांना सार्वजनिक प्रकारे अपमानित करणे आणि मारहाण करून ठार करणे सामान्य शिक्षा होती.

अ‍ॅडल्ट्री किंवा अवैध संबंधांसाठी महिलांना सार्वजनिक प्रकारे ठार केले जाते.

घट्ट कपडे घातले तरी सुद्धा अशीच शिक्षा दिली जाते.

एखादी मुलगी जर अ‍ॅरेंज मॅरेज करणे टाळत असेल तर तिचे नाक आणि कान कापून तिला मरण्यासाठी सोडले जाते.

जर महिलांनी नेल पेंट केले तर त्यांची बोटे छाटण्याची क्रुर शिक्षा दिली जाते.

 

Web Title: Taliban Rules for Women | taliban sets rules for women from execution for tight clothes to ban in public gathering

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Police Inspector Transfer | बदलून आलेल्या ‘या’ 10 पोलीस निरीक्षकांच्या पुणे आयुक्तालयात नियुक्त्या

Anti Corruption Pune-Pimpri | यापूर्वीही काही प्रकरणात स्वीकारली होती ‘लाच’; पिंपरी मनपा स्थायीचे नितीन लांडगे यांच्या PA च्या केबिनमध्ये आढळले ‘बेहिशोबी’ 8.5 लाख, अ‍ॅड. लांडगे, पिंगळे यांच्या घराची झडती सुरु होती पहाटेपर्यंत