5 KG सोन्याचे दागिने घालून उमेदवाराने दाखल केला अर्ज, पाहणारे झाले हैराण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   यावर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना अजून काहीच दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचा निवडणूक प्रचारही जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवार आपल्या अर्जांमध्ये व्यस्त आहेत. याबरोबरच कााही उमेदवार लोकांचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीही अवलंबत आहेत. मंगळवारी असाच एक देखावा पाहायला मिळाला. तमिळनाडूमधील एका उमेदवाराने 5 किलो सोन्याचे दागिने घालून नावनोंदणी केली.

सध्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरू आहे. तिरुनेलवेली जिल्ह्यातील अलंगुलम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून नामित झालेल्या हरि नादर गळ्यात सोन्याच्या अनेक जड साखळ्या घालून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले. ते तेथे उपस्थित असलेल्या मीडिया कॅमेऱ्यात कैद झाले. हरि नादर यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, त्यांच्याकडे 11.2 किलो सोने आणि 4.73 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत.

हरी नादरची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते बरचंस सोनं वागवताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, काही उमेदवार अतिशय विचित्र पद्धतीने उमेदवारी अर्ज भरताना दिसत आहेत. हरि नादर यांनी केलेल्या या सुवर्ण कामगिरीपूर्वी चेन्नईमध्ये उमेदवाराने पीपीई किट परिधान करून उमेदवारी दाखल केली. त्याचवेळी राज्यातील तंजावूर मतदारसंघातील उमेदवार हातात टरबूज घेऊन नावनोंदणी करण्यासाठी पोहोचला.

6 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान

तामिळनाडूमधील विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी पूर्ण होत आहे. राज्यातील सर्व 234 विधानसभा जागांवर 6 एप्रिल रोजी मतदान होत असून 2 मे रोजी मतमोजणी होईल. एआयएडीएमके गेली 10 वर्षे तामिळनाडूवर राज्य करत आहे. सध्या एआयएडीएमकेचे अध्यक्ष तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानास्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नेरसेल्वम आहेत.

मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी सोमवारी एडापाडी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरताना 47 लाख रुपयांहून अधिक जंगम मालमत्ता जाहीर केली आणि त्यांच्या नावावर अचल संपत्ती नसल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री ओ पन्नेरसेल्वम यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आपली एकूण मालमत्ता 61.19 लाख रुपये जाहीर केली आहे तर 2016 मध्ये त्यांनी आपली एकूण मालमत्ता 33.20 लाख जाहीर केली होती. त्याचप्रमाणे अम्मा मक्कल मुन्नेत्र कळगम (AMMK) नेते टीटीव्ही दिनाकरन यांनी प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती 19.18 लाख रुपये जाहीर केली आहे, ती 2017 मध्ये 16.73 लाख रुपये होती.