तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी आयसीयूत

चेन्‍नई : वृत्तसंस्था  
द्रमुक पक्षाचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना मूत्रपिंडाच्या संसर्गाचा आजार झाला होता. त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर घरीच उपचार चालू होते. पण ,मध्यरात्री त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने  रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B01N5P5CD0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f96943c4-9259-11e8-a587-5f7f3c93ca19′]
करुणानिधींची प्रकृती रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पुन्हा खालावली. त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना पुन्हा कावेरी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करुणानिधींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधींची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच द्रमुकच्या समर्थकांनी चेन्नईतील कावेरी रुग्णालयासमोर गर्दी केली.