TN : तुमच्याकडेही रेशनकार्ड असेल तर तुम्हाला मिळणार 2500 रुपये कॅश, अडीच कोटी लोकांच्या खात्यात येणार पैसे !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर तुम्हाला राज्य सरकारकडून 2500 रुपये रोख दिले जाणार आहेत. तामिळनाडू सरकारने रोख रक्कम देण्याची घोषणा केली आहे. शनिवारी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सर्व कार्डधारकांना तांदूळ घेण्यासाठी 2500 रुपये रोख देण्याची घोषणा केली. पोंगल उत्सवाच्या आनंदात सरकारने ही रोकड वाटप करण्याची घोषणा केली आहे. 4 जानेवारीपासून ही रक्कम वितरित केली जाईल जेणेकरून प्रत्येकजण सुखाने सण साजरा करू शकेल.

लाखो रेशनकार्डधारकांना याचा फायदा होणार

रेशनकार्डधारकांना राज्य सरकारने स्वस्त साखरदेखील पुरविली आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 26 दशलक्ष कार्डधारकांना पोंगल पॅकेजचा फायदा होणार असून पोंगल उत्सवापूर्वी त्यांचे वाटप केले जाईल. पोंगल उत्सव 14 जानेवारी रोजी आहे.

मागील वर्षी सरकार देत होती एक हजार रुपये

गेल्या वर्षीही तामिळनाडू सरकारने सर्वसामान्यांना तांदूळ खरेदीसाठी एक हजार रुपये दिले होते आणि यंदा ते 1000 रुपयांवरून 2500 रुपये करण्यात आले आहे. याशिवाय एक किलो तांदूळ, साखर मोफत देण्यात येत आहे. सीएम पलानीस्वामी यांच्या मते, 26 दशलक्ष कार्ड धारकांना पोंगल पॅकेजचा फायदा होईल. पोंगल उत्सवापूर्वी रेशनकार्डधारकांना ही रक्कम देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

2014 मध्ये AIADMK सरकारने राज्यातील जनतेला 1 किलो तांदूळ आणि एक किलो साखर देऊन 100 रुपये देण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये ही रक्कम 1000 रुपये करण्यात आली होती आणि आता मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी ती वाढवून 2,500 रुपये केली आहे.