Cholesterol Lowering Drinks | ‘या’ 4 नॅचरल ड्रिंक्सच्या मदतीने कमी होईल कोलेस्ट्रॉल, रोज प्यायची सवय करा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cholesterol Lowering Drinks | जेव्हा आपल्या रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते तेव्हा इतर अनेक आजारांचा धोका निर्माण होऊ लागतो, हृदयाशी संबंधित समस्या थेट कोलेस्टेरॉलशी संबंधित असतात. म्हणूनच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे. (Cholesterol Lowering Drinks)

 

GIMS हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा येथे काम करणार्‍या प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी नएए म्हटले आहे की, जर आपण दररोज ठराविक ड्रिंक्स घेतली तर कोलेस्ट्रॉल कमी करणे सोपे होईल (Cholesterol Lowering Tips).

 

कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करण्यासाठी नॅचरल ड्रिंक्स

1. टोमॅटोचा ज्यूस (Tomato Juice)
टोमॅटो ही एक अशी भाजी आहे जी जवळजवळ प्रत्येक घरात केली जाते, परंतु तुम्हाला माहित आहे का की याद्वारे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी केले जाऊ शकते. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे एक संयुग आढळते, ज्यामुळे लिपिड पातळी सुधारून फायदा होतो, त्यामुळे टोमॅटोचा रस दररोज प्यावा. (Cholesterol Lowering Drinks)

 

2. कोको ड्रिंक (Cocoa Drink)
जर तुम्ही डार्क चॉकलेट खाल्ले असेल तर कोकोचे नाव नक्कीच ऐकले असेल. त्यात फ्लॅव्हनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यास मदत करते, तसेच कोको ड्रिंक्समध्ये असलेले मोनो-सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड देखील शरीराला फायदेशीर ठरते.

3. ओट्स ड्रिंक (Oats Drinks)
ओट्स हे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर मानले गेले आहे. त्यात बीटा ग्लुकॅन्स असतात जे पोटात जेलसारखे पदार्थ तयार करतात. यामुळे कोलेस्टेरॉल शोषण दर कमी होतो आणि त्यामुळे चांगले परिणाम मिळतात.

 

4. ग्रीन टी (Green Tea)
ग्रीन टी हा वजन कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो,
त्यात असलेले कॅटेचिन्स आणि इतर अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात,
ज्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cholesterol Lowering Drinks | cholesterol lowering drinks tomato juice cocoa oats green tea heart attack diabetes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes | स्वयंपाक घरातील ‘या’ मसाल्याने कंट्रोल होईल ब्लड शुगर, डायबिटीजच्या रूग्णांनी असा करावा वापर

 

Immunity Improve | पावसाळ्यात ‘या’ 4 गोष्टींचे सेवन केल्याने पडणार नाही आजारी, जाणून घ्या कशी इम्युनिटी मजबूत

 

Natural Pain Killers | स्वयंपाक घरातील 5 मसाले ‘पेनकिलर’चे करतात काम, जाणून घ्या कसे?