Tata Motors | रेकॉर्ड हायपासून 25% घसरून सावरला राकेश झुनझुनवाला यांचा स्टॉक, पुढे जोरदार तेजीचा अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Motors | शेअर बाजारात (Share Market) आज जोरदार तेजी असताना ऑटो मोबाईल शेयरमध्ये सुद्धा जोरदार वाढ झाली आहे. निफ्टीवर ऑटो इंडेक्स 3 टक्क्यांहून जास्त मजबूत झाला आहे. या तेजीत दीर्घकाळ दबावाखाली असलेल्या Tata Motors च्या शेअरनेही उडी घेतली आहे. (Rakesh Jhunjhunwala Portfolio Stock).

 

आज कंपनीचा शेअर जवळपास 7 टक्क्यांनी वाढून 434 रुपयांवर पोहोचला. तर आधी बुधवारी तो 406 रुपयांवर बंद झाला. जिओ पॉलिटिकल तणावामुळे हे क्षेत्र नजीकच्या काळात दबावाखाली राहू शकते, परंतु पुढे आऊटलूक चांगला आहे. (Share Market Marathi News)

 

ब्रोकरेज हाऊस जेफरीजचे म्हणणे आहे की अलीकडील घसरणीनंतर काही ऑटो स्टॉकचे मूल्यांकन आकर्षक आहे. ब्रोकरेजने Tata Motors मध्ये 540 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्येही हा स्टॉक आहे.

 

खालील ऑटो शेअरमध्ये जोरदार तेजी

TATAMOTORS

MARUTI Suzuki

ASHOKLEY

TIINDIA

EICHERMOT

BHARATFORG

TVSMOTOR

M&M

AMARAJABAT

EXIDEIND

BAJAJ-AUTO

HEROMOTOCO

BALKRISIND

 

ब्रोकरेजने दिला खरेदीचा सल्ला
ब्रोकरेज हाउस जेफरीजने Tata Motors च्या स्टॉकमध्ये गुंतवणुकीची शिफारस करताना 540 रुपयांचे टार्गेट दिले आहे. जेफरीजने म्हटले की, वाहन उद्योग आता मंदीतून सावरत आहे. कोविड 19 महामारीनंतर ओपनिंग अप थीमचा या क्षेत्राला फायदा होईल. आगामी काळात वाढत्या मागणीचा फायदा मिळणार आहे. त्यात टाटा मोटर्सही लाभार्थी असेल.

त्याच वेळी ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरिने अलीकडेच टाटा मोटर्सच्या स्टॉकमध्ये 589 रुपयांचे टार्गेट ठेवून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलने स्टॉकमध्ये खरेदी करण्याचा सल्ला देताना 575 रुपयांचे टार्गेट दिले आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न तिमाही आधारावर 17 टक्क्यांनी वाढून 72931.86 कोटी रुपये झाले आहे. तर उत्पन्न वार्षिक आधारावर 4.50 टक्क्यांनी कमी झाले आहे.

 

राकेश झुनझुनवाला यांची 1.2% भागीदारी
बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्स लि. ची 1.2% भागीदारी आहे. कंपनीचे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 39,250,000 शेअर्स आहेत, ज्यांचे सध्याचे मूल्य 1,546.5 कोटी रुपये आहे. डिसेंबर तिमाहीत त्यांनी कंपनीतील 0.1 टक्के हिस्सा वाढवला होता. सप्टेंबर आणि जून तिमाहीत त्यांनी कंपनीत 1.1 टक्के हिस्सा घेतला होता.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Tata Motors | rakesh jhunjhunwala portfolio stock tata motors rose upto 7 percent after 25 percent fall from record high brokerage says buy check target price

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा