‘कोरोना’मुळं मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना टाटा स्टील भरघोस मदत करणार, केली मोठी घोषणा

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनामुळे देशाची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोणी आई गमावली तर कोणी वडील, कोणी भाऊ तर कोणी बहीण गमावली आहे. अनेक मुलं अनाथ झाली. अशाना दिलासा देण्यासाठी अनेक कॉरपोरेट कंपन्या पुढे येत आहे. या लोकांसाठी आता टाटा स्टीलने मोठी घोषणा केली असुन या घोषणेने सर्वांची मनं पुन्हा एकदा जिकली आहेत.

यासंदर्भात टाटा स्टीलने निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना त्या कर्मचाऱ्याच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत (म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याच्या रिटायरमेंटच्या वयापर्यंत) संपूर्ण वेतन देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तसेच कुटुंबांना वैद्यकीय तसेच निवासाची सोयही मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि भागधारकांच्या हितासाठी कंपनी व्यवस्थापन नेहमीच कार्यरत आहे. कोरोनाच्या संकटातही टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचार्‍यांच्या आणि समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हंटले आहे.

ADV

एवढेच नाही तर टाटाने एखाद्या फ्रंटलाईन वर्करचा आपले कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला, त्यांच्या मुलांचा भारतात पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च कंपनी व्यवस्थापन उचलणार आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी टाटाने यापूर्वीही अनेक पावले उचलली आहेत.