IMP NEWS : महाबळेश्वर, पाचगणीच्या टॅक्सी भाड्यात तब्बल ‘एवढ्या’ टक्क्यांनी वाढ वाढ, पर्यटकांच्या खिशाला बसणार चाट

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने महाबळेश्वर आणि पाचगणी येथील टॅक्सी भाड्यात 20 दरवाढ केली आहे. ऐन मोसमात टॅक्‍सी दरवाढ झाल्याने पर्यटकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दरम्यान तब्बल सात वर्षानंतर भाडेवाढ झाली असून पर्यटकांनी टॅक्सी संघटनेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महाबळेश्‍वर, पाचगणी, तापोळा, प्रतापगड, वाई या पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी प्रवासी पर्यटकांना घेऊन जाणा-या टॅक्सीच्या भाड्यात 20 टक्के दरवाढ केली आहे. ऑक्‍टोबर ते जून महिन्यापर्यंत राज्य व राज्याबाहेरील पर्यटक येथील सदर पर्यटनस्थळांना मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. प्रवासी व टॅक्‍सीचालकांमधील वाद टाळण्यासाठी 2013 पासून पॉइंट टू पॉइंट टॅक्‍सीचे भाडे ठरवून दिले आहे. परंतु, 2013 ते 2020 या कालावधीत कोणतीही दरवाढ केली नव्हती. सद्य:स्थितीत पेट्रोल-डिझेलची दरवाढ, वाढती महागाई, कोरोनाच्या काळात बंद असलेला व्यवसाय, विमा हप्त्यामधील वाढ, सुट्टे भागांच्या किमतीत वाढ आदींमध्ये झपाट्याने दर वाढल्यामुळे टॅक्‍सी व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याने टॅक्‍सी दरपत्रकात वाढ करण्याबाबतचे निवेदन काही दिवसांपूर्वी महाबळेश्‍वर-पाचगणी टॅक्‍सी संघटनांनी दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन नुकतीच नवीन दरवाढ लागू झाली आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जाहीर केलेले नवे दर पुढील प्रमाणे आहेत
महाबळेश्‍वरपासून प्रतापगड दर्शन 1200 रुपये.

महाबळेश्‍वर दर्शन 660 रुपये

महाबळेश्‍वरपासून पाचगणी दर्शन 840 रुपये

पाचगणी ते वाई 840 रुपये

महाबळेश्‍वरपासून तापोळा दर्शन 1200 रुपये

शहरातील इतर कोणतेही दोन किलोमीटपर्यंत स्थानिक पॉइंट 100 रुपये

पाचगणीपासून प्रतापगड दर्शन 1680 रुपये

पाचगणीपासून महाबळेश्‍वर दर्शन 1440 रुपये

पाचगणी दर्शन 640 रुपये

पाचगणीपासून वाई दर्शन 1080 रुपये

पाचगणीपासून तापोळा दर्शन 1800 रुपये

टेबल लॅंड 120 रुपये.