5G Technology : किती फायदेशीर आहे ‘हे’ तंत्रज्ञान, जाणून घ्या तपशीलवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   दिवसेंदिवस तंत्रज्ञान अडव्हान्स होत चाललं आहे. भारतातही 5 जी तंत्रज्ञानाची बरीच चर्चा होत आहे. अलीकडेच, दूरसंचार कंपनी एअरटेलने हैदराबादमध्ये 5 जी कमर्शियल सेवा सुरू केली होती. त्यानंतर आता 5 जी तंत्रज्ञान लवकरच येणार असल्याचे समजते. अशा परिस्थितीत जाणून घेऊया या 5 जी तंत्रज्ञानाविषयी आणि त्या संबंधित फायद्यांविषयी …

वाढणार बँडविड्थ

बँडविड्थ म्हणजे अशी स्पेस, जे वापरकर्त्यांना डेटा वापरण्यासाठी, व्हिडिओ डाउनलोड करण्यापासून फायली डाउनलोड करण्यापर्यंत प्रदान केले जाते. 5 जी तंत्रज्ञान आल्याने बँडविड्थ वाढेल आणि डिवाइस वेगाने काम करतील. याशिवाय बर्‍याच वापरकर्त्यांना एकाच वेळी इंटरनेट वापरण्याची सुविधा मिळेल. महत्वाचे म्हणजे जर जास्त वापरकर्त्यांनी इंटरनेट वापरला तरी देखील वेग अजिबात कमी होणार नाही.

अनेक पटींनी वाढणार डेटा स्पीड

5 जी तंत्रज्ञानाच्या येण्याने डेटाची गती 4 जीच्या तुलनेत अनेक पटींनी वाढेल. या तंत्राद्वारे, 8 के फॉरमेटमध्ये असलेले व्हिडिओ काही सेकंदात डाउनलोड केले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, हे तंत्रज्ञान फॅक्टरी रोबोटिक्स, सेल्फ-ड्रायव्हिंग कार तंत्रज्ञान, मशीन लर्निंग नेटवर्क, क्लीन एनर्जी टेक्नॉलॉजी आणि प्रगत वैद्यकीय उपकरणांशी संबंधित क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते.

नवीन तंत्रज्ञानाचा शोध

5 जी तंत्रज्ञानाच्या माहितीमुळे डेटाची गती वाढेल आणि अधिकाधिक कार्ये संगणकाच्या जगापासून स्मार्ट उपकरणांच्या जगात रूपांतरित होऊ शकतात. याव्यतिरिक्त, हाय-स्पीड डेटा स्मार्ट डिव्हाइस तंत्रज्ञान विकसित करेल आणि नवीन तंत्रज्ञानासाठी दार उघडले जाईल.

एअरटेलने नुकतीच सुरू केली 5 जी सेवा

दूरसंचार कंपनी एअरटेलने नुकतीच 5 जी व्यावसायिक सेवा सुरू केली आहे. एअरटेलने हैदराबादमध्ये 5 जी सर्व्हिसचे ट्रायल रन सुरू केले आहे. यावेळी एअरटेलने 3Gbps चा टॉप स्पीड मिळविला आहे, जो जिओच्या 5G स्पीडपेक्षा तीन पटीने जास्त आहे. जिओने ट्रायल रनच्या 1Gbps चा टॉप स्पीड मिळविला होता. एअरटेल कंपनीने दावा केला कि, या वेगाने अवघ्या 8 मिनिटांत एचडी चित्रपट डाउनलोड करता येतील.

एअरटेलचे म्हणणे आहे की, 5 जी सेवेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता कंपनी भारतात 5 जी सेवा रोलआउट करण्यासाठी भारत सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. कंपनीने पुढे म्हटले की, हैदराबादस्थित एअरटेल स्टोअरमध्ये 1800 बँड 5 जी गती मिळविली जाऊ शकते. तसेच, विद्यमान स्पेक्ट्रम बँडवर 5G नेटवर्क उपलब्ध केले जाऊ शकतात. एअरटेल 5 जी सेवेची ट्रायल रन कोर नेटवर्क, ट्रान्सपोर्ट नेटवर्क, रेडिओ नेटवर्कवर संपूर्ण यश आले आहे. यावेळी, एअरटेलने 10X स्पीड, 10X लेटेन्सी आणि 100x अ‍ॅक्यूरसी मिळविली आहे.