TV आणि ‘स्ट्रिमिंग’ची धमाल ‘एकत्र’, ‘Airtel’ च्या ‘Xstream’ स्टिकची खासियत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिजिटल क्रांतीमुळे मनोरंजनाची पद्धत बदलली आहे. परंतू यात आता टीव्ही देखील मागे नाहीत ना की दर्शक. भारतातील सर्वात मोठ्या नेटवर्क ऑपरेटर Airtel ने डिजिटल मनोरंजनाला एक पाऊल पुढे नेले आहे. Airtel ने Xsteam लॉन्च केलं आहे. जामुळे दर्शक कधीही कुठेही, टीव्ही, मोबाइल, कंप्युटर वरुन त्यांच्या आवडीचे टीव्ही प्रोग्रामचा आणि स्ट्रिमिंगचा फायदा घेऊ शकतात.
Airtel
Xstream स्टिक
ही अ‍ॅण्ड्राइड 8.0 बेस स्टिक आहे. यातून ग्राहक 10 हजार सिनेमांबरोबर नेटफ्लिक्स, अमेझॉन सारख्या स्ट्रमिंग सर्विसचा फायदा घेऊ शकतील. तसेच 60 लाख हून अधिक गाणे ऐकू शकतील. या स्टिकमध्ये 1.6 GHZ चा प्रोसेसर आहे, शिवाय वॉइसच्या माध्यमातून वॉइस इनबिल्ड सर्चचे फिचर आणि ब्यूटूथ 4.2 ची सुविधा मिळेल. याची किंमत 3,999 रुपये असेल.

एअरटेल थॅंक्सच्या प्लॅटिनम ग्राहकांना आणि गोल्ड ग्राहकांना या स्टीक बरोबर सब्सक्रिप्शन फ्री मिळेल. तर इतर ग्राहकांना 30 दिवस यांची मोफत सुविधा घेता येईल. त्यानंतर 999 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल.
Airtel1

Xstream बॉक्स –
ग्राहकांना कंपनीने दुसरा पर्याय दिला आहे, Xstream बॉक्स. याद्वारे ग्राहक टीव्ही स्मार्ट बनवू शकतो. अ‍ॅण्ड्राईड असलेल्या या बॉक्समधून ग्राहक 500 टीव्ही चॅनल आणि 10 हजार पेक्षा जास्ता सिनेमा पाहू शकतो. यात नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम सारखे अ‍ॅप प्री इन्स्टॉल असतात. ग्राहक गेमेंगची मजा देखील अनुभवू शकतात. या बॉक्सच्या माध्यमातून ग्राहकांना Xstream अ‍ॅपचे एक वर्षाचे सब्सक्रिपशन मिळेल. HD DTH पॅक एक महिन्याचे सब्सक्रिप्शन मिळेल. याची किंमत 3999 रुपये असेल. Airtel डिजिटल टीव्ही ग्राहक 2249 रुपयात आपला बॉक्स X stream बॉक्सने अपग्रेड करु शकतात. हे बॉक्स फिल्पकार्ट आणि अमेझॉनवरुन ग्राहक खरेदी करु शकतात, तसेच स्थानिक इलेक्ट्रिक दुकानातून तसेच विजय सेल्समध्ये ही फायर स्टीक आणि बॉक्स उपलब्ध असेल.

Xstream अ‍ॅप –
हे टीव्हीचे मॉर्डन वर्जन आहे. यात ग्राहकांना 400 लाइव टिव्ही, 10 हजार सिनेमे आणि नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम सारख्या स्ट्रिमिंग सर्विसची सुविधा मिळेल. ग्राहक www.airtelxstream.in वर Xstream वरुन सर्व शो, सिनेमा आणि लाइव टीव्ही पाहायला मिळेल.

डिजिटल इंडियाच्या मनोरंजनासाठी airtel चे Xstream –
1. टीव्ही आणि स्ट्रिमिंगची सुविधा एकत्र

2. अ‍ॅप, स्टिक आणि बॉक्सच्या माध्यमातून मनोरंजन

3. प्रत्येक टीव्ही होणार HD