Airtel ची जबरदस्त ऑफर ! 279 रुपयांच्या प्लॅनमध्ये रिजार्चसह मिळणार 4 लाखांचे विमा कवच, जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्त संस्था – हल्ली ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यामध्ये मोठी स्पर्धा सुरु आहे. ग्राहकांसाठी निरनिराळे प्लॅन्स बाजारात आणले जात आहेत. अशातच भारतीय टेलिकॉम कंपनी Airtel ने नुकतेच जबरदस्त 2 नवे प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या दोन्ही प्लॅनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकांना फ्री कॉलिंग अन् हाय स्पीड 4G इंटरनेटशिवाय हेल्थ इन्शोरन्सचा लाभ मिळणार आहे.

1) 279 रुपयांत 4 लाखांचा इन्शोरन्स
Airtel कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जर ग्राहकांनी 279 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ॲक्टिव्ह केला, तर त्यांना या प्लॅनमध्ये दिवसाला 1.5GB हाय स्पीड 4G डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS पाठवण्याच्या सुविधेसह 4 लाख रुपयांचा लाईफ इन्शोरन्ससही मिळणार आहे. या लाईफ इन्शोरन्ससाठी कोणत्याही मेडिकल टेस्ट किंवा पेपरवर्कची गरज देखील भासणार नाही. तसेच या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वॅलिडिटीसह एअरटेल Xstream Premium चं सब्सक्रिप्शनही मोफत देण्यात आले आहे. डेली लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होणार आहे.

2) 179 रुपयांत 2 लाखांचा इन्शोरन्स –
Airtel च्या 179 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 2 लाखांचा लाईफ इन्शोरन्स ऑफर करण्यात आला आहे. या रिचार्ज प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यात यात दररोज 2GB हाय स्पीड 4G इंटरनेट, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 300 SMS ची सुविधा देण्यात आली आहे. तसेच एअरटेल Xstream Premium चे फ्री सब्सक्रिप्शन देण्यात आले आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होणार आहे.