Teen Adkun Sitaram Movie | ‘तीन अडकून सिताराम’ चित्रपटाच्या हटके नावाचा दिग्दर्शकांनी सांगितला खरा अर्थ

पोलीसनामा ऑनलाइन – Teen Adkun Sitaram Movie | सध्या चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांचा बोलबाला असून अनेक मराठी चित्रपटांनी तगडी कमाई केली आहे. प्रेक्षकांमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी (Actress Prajakta Mali) हिच्या आगामी चित्रपटाबाबत उत्सुकता आणि चित्रपटांच्या नावाबाबत कुतूहल आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लवकरच तिचा ‘तीन अडकून सिताराम’ (Teen Adkun Sitaram Movie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्राजक्ताचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची प्रतिक्षा करत असले तरी ‘तीन अडकून सिताराम’ हे चित्रपटांचे नाव ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले. या चित्रपटाच्या हटके नावाबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक हृषिकेश जोशी (Director Hrishikesh Joshi) यांनी केले आहे. ‘तीन अडकून सिताराम’ या नावामागचा अर्थ त्यांनी स्पष्ट केला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला असून तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका देखील साकारल्या आहेत. प्राजक्ता माळी ही ‘तीन अडकून सिताराम’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची चर्चा जोरदार रंगली असून चित्रपटाच्या हटके नावाबद्दल देखील अनेकांना उत्सुकता आहे. आता चित्रपटाचे दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी ‘तीन अडकून सिताराम’ या नावाचा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी या मागचा अर्थ सांगितला आहे.

‘तीन अडकून सिताराम’ (Teen Adkun Sitaram Movie) चित्रपटाचे दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणाले की, “ही एक पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रचलित म्हण किंवा वाक्यप्रचार आहे. एखाद्याचा तीन अडकून सीताराम होणे हे मी बऱ्याचदा कोल्हापुरात ऐकले आहे, किंबहुना मीदेखील या म्हणीचा वापर केला आहे. विचित्र मनोरंजक परिस्थितीत अडकलेल्या माणसासाठी ही म्हण वापरली जाते. जेव्हा कथा लिहून झाली तेव्हा यातील तीनही नायकांची झालेली अवस्था पाहून आपसूकच हे नाव डोक्यात आले.” असे हृषिकेश यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, या म्हणीविषयी इथे ठाऊक नव्हतं हे मला माहीत नव्हते. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. सगळ्यांना पहिल्यांदा ऐकताक्षणी हे काहीतरी वेगळे असल्याची जाणीव झाली. चित्रपट किंवा त्यातील विनोदनिर्मिती ज्या पद्धतीची आहे तसेच चित्रपटाचे नावदेखील तसेच असायला हवे. कोल्हापुरातील अनेक प्रेक्षकांनी फार दिवसांनी हा शब्दप्रयोग कानावर पडल्याची प्रतिक्रिया दिली आहे तर काही लोकांनी हे नाव ऐकून अगदीच भुवया उंचावल्या आहेत. चित्रपटाच्या नावाबाबत अशा विविध प्रतिक्रिया मला पाहायला मिळाल्या आहेत.” असे दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी ‘तीन अडकून सिताराम’ या चित्रपटाच्या नावामागची कहानी सांगितली आहे.

‘तीन अडकून सिताराम’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने प्रमुख भूमिका साकारली असून
तिच्यासोबत चित्रपटामध्ये वैभव तत्त्ववादी (Vaibhav Tattavadi), संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Kahrade),
आलोक राजवाडे (Alok Rajwade), आनंद इंगळे (Anand Ingle) हे कलाकार देखील भूमिका साकारताना दिसणार आहेत.
‘तीन अडकून सीताराम’ चित्रपट येत्या 29 सप्टेंबर रोजी भेटीस येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Toll Hike | मुंबईचा रस्तेप्रवास महागला; पथकराच्या दरामध्ये झाली वाढ,1 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू