तेजश्री प्रधाननं पहिल्याच हिंदी सिनेमात दिलाय लीप लॉक, चित्रपट अद्याप…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  झी मराठीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान(Tejashree Pradhan) ही महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) महाराष्ट्राची लाडकी आणि आदर्श सून बनली. या मालिकेआधी तिने ‘झेंडा’ या चित्रपटात काम केले होते. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता या मालिकेने मिळवून दिली. तेजश्रीने ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेनंतर चित्रपटात आणि नाटकात काम केलं. त्यामुळे छोट्या पडद्याला काही काळासाठी तिने रामराम ठोकला होता. ‘अग्गंबाई सासूबाई’ या नुकत्याच संपलेल्या तिच्या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता.

नवी मुंबईत भाजपला हादरे सुरुच, मोठ्या नेत्याचा ‘मनसे’त प्रवेश

‘बबलू बॅचलर’ या चित्रपटात शर्मन जोशी आणि तेजश्री यांची जोडी जमली असून त्यांनी याआधी एका नाटकात काम केले होते. या नाटकाला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे आता मोठ्या पडद्यावर त्या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘बबलू बॅचलर’ या चित्रपटाचा ट्रेलर गेल्यावर्षी प्रदर्शित झाला होता. तेजश्री ‘बबलू बॅचलर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती. पण कोरोनाच्या संकटामुळे तिचा ‘बबलू बॅचलर’ हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण या ट्रेलरमध्ये चक्क तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांचा किसिंग सीन पाहायला मिळाला होता. पहिल्याच चित्रपटात तेजश्रीने किसिंग सीन दिल्याने याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

Ashok Chavan : ‘नितीन गडकरी हे चुकीच्या पक्षात असलेले योग्य व्यक्ती’

तेजश्री प्रधानने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. तेजश्रीच्या विविध सिनेमातील तिच्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत. छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे. हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत.

 

‘या’ 6 गोष्टी मेहंदीमध्ये मिसळल्या जातात

‘पवित्र रिश्ता 2’ करण्यास उषा नाडकर्णी यांचा नकार, जाणून घ्या कारण

हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी तरुणांसाठी घातक आहेत ‘ही’ लक्षणे; जाणून घ्या

घरबसल्या ‘या’ पध्दतीनं करा बॉडी पॉलिशिंग, पार्लर सारखा ग्लो मिळेल, जाणून घ्या